गावातील ग्रामपंचायत ठराव का बदलला जर लोकशाहीत ग्रामपंचायत ठरावाला महत्व नसेल तर जिल्हा आधीकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावरील समस्याची माहिती का..? घेतली नाही आणि जिल्हा आधीका-यांने माहिती पञक का..? काढले नाही संबधीत सर्वे नंबरची माहिती का..? प्रकाशीत केली नाही जर सर्व समस्या या कार्यालतून जर सुटल्या असल्या असत्या तर आम्हाला लोकशाही पध्दतीने आडवावे लागले नसते जर रेती काढायची असेल तर आमच्या समस्या सोडवाव्यात आणि वाळू उपसा करावा...
१) पळसपूर नदीस पाणी सोडण्याची जबबादारी प्रशासनाने घ्यावी ज्या प्रमाणे पेंड सर्वे नंबर बदलता येतो त्या प्रमाणे गावातील नदीस बंधारा उपलब्ध करूण देण्यात यावा. कारण दहा वर्षे झाले आम्ही बंधारा मागणी करतोय... पळसपूर गावास कोणताही बंधाराचा फायदा होत नाही. आमची नदी सप्टेबर महिण्या पासून कोरडी पडते... तेव्हा पासून पाणी प्रश्न निर्माण होते. गुराणा-ढोराणा भंटकती करावी लागते. गावतील पाणी पातळी अतिश्य खालावलेली आहे. यांची पाहणी करावी माहिती मागवावी जर वाळू उपसा झाला तर पाणी पातळीत घट होईल....
२) पळसपूर हा पेंड पर्यावरण मध्ये आहे. यांची माहिती काढावी कारण जर तेथील वाळू उपसा केला तर सर्वात जास्त जमीन खोदल्याने नदी पाञात बदल होईल याची सुध्दा पाहणी करावी..
3) कोपरा येथील पाणी स्पलाई विहीर आहे याची नोंद घ्यावी..
4) लोकवाट्यातून केलेला रस्ता वाळू उपसा केल्याणे अतिश्य खराब होतो याची जबाबदारी कोण घेणार..
5) गावातील नवीन शाळेमागील भाग जास्त दबला जातो त्या मुळे शाळेत देखील मुरूम टाकावा लागेल..
6) शेतक-यांना धमकावने पोलासाचा धाक दाखवीणे तसेच जिवे मारण्याच्या धमकावणे यास जबाबदार कोण रहाणार ..
7) गावातील सर्व शेतक-यांना माहिती मागीतील तर मिळत नाही व आम्हास माहीतीचा आधीकारातुन सर्व माहिती द्यावी. जर माहिती मिळत नसेल तर पेंडवर स्थगीती द्यावी कारण सर्व शेतक-यांना कोर्टात न्याय मागावा लागेल ..
8) रेतीवाल्याना जो रस्ता दाखवीला जातो आहे तो काही सरकारी तर काही मालकीचा आहे. त्यामुळे शेतक-याच्या शेतातून वाळू उपसा करण्याचा कोणता आधीकार आहे... ते सांगावे किंवा समंधीत शेतक-याना तुम्ही लाच देवून कोणत्या कायद्याने वाळू उपसा करण्यास सांगत आहात..
9) जे वाळू उपसा करण्याचा माहिती दिली.. त्यातील अटी पालन करण्याची जबबादारी घ्यावी... तरच आणि तरच येथील घाटावरऔन वाळूचा उपसा व्हावा
....लेखक - कल्याण पाटील, पळसपूर, ता.हिमायतनगर, जी.नांदेड.