मुखेड, रणजित जामखेडकर| येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिवाजी कराळे यांना जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने सन २०२१ या वर्षासाठी दिला जाणारा ह्लजिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्कारह्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नुकताच सपत्नीक प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर तर आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे,आ.बालाजी कल्याणकर, मा.आ. हणमंतराव पा.बेटमोगरेकर,अविनाशराव घाटे,माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर,शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत नवनवीन उपक्रमांचे आयोजन करणे,स्पर्धा परीक्षेची तयारी घेणे,कोविड काळात ऑनलाईन वर्गाध्यापण करणे,शैक्षणिक साहित्य-ब्लॉग तयार करणे इत्यादी कार्यासोबतच त्यांनी सतत २० वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रु.पेक्षा जास्त रक्कम संकलित केली आहे.उत्कृष्ट केंद्रस्तरीय अधिकारी,कोविड लसीकरण यशस्वीतेसाठी जनजागृती केली आहे.विविध नियतकालिकात स्तंभलेखक म्हणून त्यांनी लेखन केले असून त्यांचे विविध विषयावरील १५ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.
त्यांच्या यशाबद्दल ता.कॉंग्रेस अध्यक्ष भाऊसाहेब पा.मंडलापुरकर,प्राचार्य मनोहरराव तोटरे, गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे,अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदासराव बस्वदे,संयुक्त चिटणीस दिलीपराव देवकांबळे,मुख्याध्यापक जी. सी.चव्हाण,अशोक पाटील,प्रल्हाद राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार शिक्षक,पालक यांनी अभिनंदन केले आहे.