हदगाव, शे चाँदपाशा| शहरातील अनेक प्रशासकीय कार्यालये व बँका मध्ये बाहेर गावाहुन येणा-या नागरिकाकरिता पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्याने तसेच महीला करिता शौचालयची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातुन येणा-या नागरिक व महीलांची चांगलीच गैरसोय होत आहे. ह्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाच्या प्रमुखाकडे वेळ नसुन, ते साफ दुर्लक्ष करित असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
शहरातील अनेक शासकीय कार्यालय मध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट दिसुन येत आहे परिणामी कार्यायलये मध्ये कामाकरिता येणा-या नागरिक व महीला करिता व काही शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. किमान प्रशासकीय कार्यालयाच्या प्रमुखानी उन्हाळ्यात तरी सामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल अशी, कोणत्याही प्रकारची सध्यातरी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केल्याचे दिसुन येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
विशेष म्हणजे मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देणे कार्यालय प्रमुखाचे काम आहे पण नागरिकाँच्या सुविधाकडे साफ दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे परिणाम स्वरुप त्याचा फटका बाहेर गावाहुन येणा-या सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. पुढील दोन महीने तापमान चांगलेच वाढणार आहे शहरात अनेक प्रशासकीय कार्यालय व बँका आहेत. कामा निमित्तानं शहरात शेकडो नागरिक शहरात येतात नागरिकांना कार्यालयात अनेक तास थाबावे ताटळतथाँबावे लागत आहे या बाबतीत तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी प्रशासकीय प्रमुखांना या बाबतीत सुचना तरी दियाव्यात अशी अपेक्षा नागरिकां कडुन केली जात आहे.