हिमायतनगर| महाशिवरात्री निमित्र हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या शिव भक्तांना मनसे तालुका शाखेच्या वतीने केळीचे वाटप करून महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजीक बीधिलकी जपली आहे.
महाशिवरात्री निमित्त परमेश्वर मंदिर देवस्थानची पंधरा दिवस यात्रा भरत असते. परंतु यंदा कोरोना काळामुळे यात्रा रद्द करण्यात आली असुन, भक्तांना केवळ श्री दर्शन घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. दर्शनाकरीता रांगेत असलेल्या भक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून केळीचे वाटप करण्यात आले.
यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष अंकुश तिगलवाड, मनसे शहर अध्यक्ष ओमकार रेखावार, मनविसे शहराध्यक्ष ओमकार चर्लेवार, मनसे विद्यार्थी तालुका अध्यक्ष लक्ष्मण टेकाळे पाटील व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.