हिमायतनगर। येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालया अंतर्गत समाजशास्त्र विभागाच्या वतीन "गौरव स्त्रीत्वाचा: ध्यास समानतेचा" या विषयावर एक दिवसीय महिला कार्यशाळा दिनांक 11 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते ह्या भूषविणार आहेत. दोन सत्रांमध्ये चालणार्या या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता होईल. उद्घाटक म्हणून सौ. अरुणा कुलकर्णी संचालिका मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था ह्या लाभणार आहेत. तर साधन व्यक्ती म्हणून सौ. अनुराधा पत्की नाट्यशास्त्र विभाग व अभिनेत्री, नांदेड भूषविणार आहेत. दुसऱ्या साधनव्यक्ती म्हणून सौ. विद्या पाटील सचिव मानिनी मराठा महिला मंडळ, इनरवील क्लब, नांदेड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तर दुसर्या सत्रामध्ये साधन व्यक्ती म्हणून सौ. अपर्णा नेरलकर अध्यक्षा अखिल भारतीय नाट्य परिषद व नगरसेविका, नांदेड ह्या उपस्थित राहतील. तसेच कु. सपना भागवत लोकमत सखी मंच, नांदेड ह्या ही साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. अशा दोन सत्रात चालणार्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख व स्टॉफ सेक्रेटरी प्रा. डॉ. डी के कदम यांनी केले आहे.