अर्धापूर, निळकंठ मदने| शहरातील शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागच्यावतीने अर्धापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला पदाधिकारी व स्थानिक प्रशासनातील महिला अधिकारी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील होते. तर प्रमुख पाहुणे नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, अर्धापूरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर,पंचायत समिती अर्धापूरच्या सभापती सौ.कांताबाई अशोकराव सावंत, अर्धापूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष यास्मीन सुलताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली कांबळे, डाॅ.पल्लवी विशाल लंगडे , माजी सभापती मंगलाताई स्वामी, डाॅ. कविता केंद्रे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात कु. सानिका गावंडे, माजी सभापती मंगलाताई स्वामी, तहसीलदार उज्वला पांगरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली कांबळे, प्राचार्य डॉ.के.के.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अर्धापूर तालुक्यातील 25 महिला सरपंच पदाधिकारी नऊ नगरपंचायतीच्या महिला नगरसेवक, पंचायत समितीच्या सभापती व तालुक्यातील महिला अधिकारी यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.रघुनाथ शेटे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.डॉ. काझी एम.के. देळुबकर यांनी केले तर आभार प्रा.मनिषा पवार यांनी मानले.
यावेळी अर्धापूर नगरपंचायतच्या नगरसेविका सौ.शालिनी व्यंकटेश शेटे,सौ.वैशाली प्रवीण देशमुख, सौ.मिनाक्षी व्यंकटी राऊत,कृषी सहाय्यक जारिकोटे सविता वैजनाथ, बारसगाव सरपंच मनीषा गजानन खंडागळे, दिग्रस नांदला सरपंच मुक्ताबाई रामदास तिडके, दाभड सरपंच कांचन कुलदीप सूर्यवंशी, जांभरून सरपंच शितल आकाश बहादुरे, पाटनूर सरपंच गंगासागर बाळू कोकाटे, चेनापूर सरपंच भगीरथाबाई उत्तम महागडे, लोणी खुर्द सरपंच अनुसयाबाई निवृत्ती लोणी, लोणी बुद्रुकचे सरपंच वैष्णवी विजयकुमार भुस्से, पांगरी सरपंच गंगासागर सतीश कदम, पार्डी सरपंच जिजाबाई चांदु कांबळे, शेनी सरपंच प्रिया अनिल धुमाळ, उमरी सरपंच रमा परमेश्वर ढवळे, कामठा बुद्रुक सरपंच दुर्गा विश्वनाथ दासे, कोंढा सरपंच गोदावरी माधव पांचाळ, मेंढला खुर्द सरपंच कुंताबाई उत्तमराव नवले, मेंढला बुद्रुकचे सरपंच मंगल धर्माजी गजभारे, बामणी सरपंच शिल्पा साहेबराव कदम आणि पिंपळगाव महादेवच्या सरपंच लता कपिल दुधमल ह्या उपस्थित होत्या व सर्व सरपंच महिला पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास आदिंची उपस्थिती होती.