देसाई व शुभंकरोती फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
नांदेड। महिला दिनानिमित्त केवळ महिलांचा सन्मान न करता त्याबरोबरच महिलांना प्रशिक्षण देऊन स्वबळावर उभे करण्याच्या उद्देशाने व महिला सबलीकरण हा उद्देश समोर ठेऊन देसाई फाउंडेशन व शुभंकरोती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेलूत महिलांसाठी मोफत पार्लर, संगणक व शिलाई प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन दि ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले .नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे काम करणारी संस्था आता सेलू तालुक्यात सुद्धा सामाजिक उपक्रम राबवित असून कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून येथील प्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर बाहेती होते तर व्यासपीठावर जी प सदस्य अशोकराव ( नाना ) काकडे,शुभंकरोती फाउंडेशन चे किरण चौधरी ,देसाई फाउंडेशन चे मनोज पांडा व किरण रावराणी यांची प्रमुख उपस्थिती होती .
या कार्यक्रमानिमित्त महिला व मुली साठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या व त्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आहे .प्रत्येक स्पर्धेतील प्रथम पारितोषक पैठणी ( अशोकराव ( नाना ) काकडे यांच्या कडून ) तर द्वितीय पारितोषक डिनर सेट ( तुळजाभवानी बँके कडून ) देण्यात आले . यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत बॅलन्सिंग गेम मध्ये प्रतीक्षा बापट,दोरीवरील उड्या कल्पना पुरी व संगीत खुर्ची स्पर्धेत सरला फंड यांना पैठणी तर उखाणे स्पर्धेत वर्षा खर्डेकर ,बांगडी पिन मध्ये शीतल डासाळकर, बलून ट्रेन मध्ये मीना गोरे व दुर्गा पांचाळ याना पारितोषक देण्यात आले . यावेळी मनोगतात नंदकुमार बाहेती, किरण चौधरी ,मनोज पांडा व किरण रावराणी यांनी सध्या महिला सबलीकरण कसे आवश्यक आहे व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आपला आर्थिक विकास करून घेण्यासाठी या प्रशिक्षण केंद्राचा कसा फायदा होणार आहे याबाबत माहिती दिली .उदघाटक नंदकुमार बाहेती व प्रमुख अतिथीअशोक ( नाना ) काकडे यांनी यावेळी फीत कापून सर्व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अभिजित बारडकर यांनी मानले .या कार्यक्रमासाठी व स्पर्धेसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती .