पंचायत समिती अर्धापूर येथे जागतिक महिला दिन साजरा -NNL


अर्धापूर,निळकंठ मदने।
जिल्हा परिषद नांदेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महीला सप्ताह उत्सव स्त्री जाणीवांचा पाऊल पडते पुढे हा उपक्रम २ मार्च ते ८ मार्च विविध उपक्रम पंचायत समिती अर्धापूर स्तरावर राबविण्यात आले . त्याच अनुषंगाने पंचायत समिती अर्धापूर सभागृहात ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .

कार्यक्रमचा अध्यक्षस्थानी सौ कांताबाई अशोकराव सावंत सभापती हे होते तर प्रमुख अतिथी तालुका विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष तथा न्यायाधिश मगेश बिरहारी , उपसभापती अशोकराव कपाटे, पंचायत समिती सदस्या सौ मंगलताई शिवलिंग स्वामी, गटविकास अधिकारी डि एस कदम, अँड पत्रे, अशोकराव सावंत, गटशिक्षणाधिकारी ससाने, कृषी अधिकारी राजे व  महावितरण चे उप अभियंता रामगिरवार,आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 पहिल्या प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ,कान्तीजोत्ती सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन प्रमुख मान्यवर चा हस्ते करण्यात आले . कार्यक्रम चे प्रस्ताविक गटविकास अधिकारी डि एस कदम सर यांनी केले पंचायत समिती स्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रम यांची माहिती दिली. त्या नंतर जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती स्तरावरील व ग्रामीण भागात विविध विभागांचे काम करणारे अधिकारी व महीला कर्मचारी तसेच कोव्हीड १९ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या  यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यामध्ये आशा, ग्रामसेविका अंगणवाडी, अगनवाडी पर्यवेक्षिका,शिक्षीका, ए.एन.एम., आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महीलाना जिल्हा परिषद उपकर योजना कृषी विभाग यांच्या कडून प्रत्येकी दहा हजार रुपये धनादेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना अंतर्गत या वर्षात सिंचन विहीर पुर्ण करणारे महीला लाभार्थी यांचा हि सत्कार करण्यात आला. कोव्हीड मध्ये उत्कृष्ट काम करणारे प्रा. शाळा कारवाडी येथील संतोष राऊत सर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

जागतिक महिला दिनानिमित्त महीला यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या नंतर कार्यक्रम चे प्रमुख अतिथी अर्धापूर न्यायालयांचे न्यायाधिश मंगेश बिरहारी यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व व महीला साठी असलेल्या विविध कायदे , समित्या , लोकन्यायालयाचे महत्त्व, या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले त्याच बरोबर न्याय सर्वांसाठी लोकअदालत यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विस्तार अधिकारी डॉ एस पी गोखले यांनी केले

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी