नांदेड येथील वैद्यकीय अध्यापकांचा एल्गार 14 मार्च पासून रूग्नसेवा बंद -NNL


नांदेड।
येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अध्यापकांनी आज महाविद्यालयाच्या परिसरात निदर्शने करून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी परत एकदा एल्गार केला असून दिनांक 14 मार्च 2022 पासून अत्यावश्यक सेवा व covid-19 रूग्ण सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरले असल्याचे संघटनेचे सचिव डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले .

सभेमध्ये मागील आठवड्यापासून सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असून शासनाकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये सुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित केला असता माननीय मंत्री महोदय वैद्यकीय शिक्षण यांच्याकडून कुठलाही निर्णय त्यांनी जाहीर न केल्यामुळे आता हे आंदोलन तीव्र होत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय मोरे यांनी सांगितले.

 आजच्या आंदोलनांमध्ये महाविद्यालयातील सर्व अध्यापक सहभागी झाले होते सर्वांनी 14 मार्च पासून कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे रुग्णांची गैरसोय होईल त्याबद्दल खेद व्यक्त केला असून शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला तर हे आंदोलन मागे घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

 आजच्या आंदोलनाचे नेतृत्व महाविद्यालयातील डॉ, जे बी  देशमुख ,डॉ हेमंत  गोडबोले सर ,डॉ. पंकज कदम डॉ. किशोर राठोड ,डॉ मुंगळ, डॉक्टर समीर ,डॉ तोटावाड ,डॉ सुधा ,डॉ वैशाली, डॉ अनुजा  देशमुख , डॉ कर्डिले , डॉ भगत मॅडम,डॉ नागरिक, डॉ मुधोळकर ,डॉ देगावकर,डॉ केळकर, डॉ अरविंद चव्हाण,डॉ तांबे, डॉ तांबोळी  यांनी केले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी