घोटाळेबाजांकडून केंद्राच्या ED, CBI वर दबाव; मोदींचा शिवसेना, राष्ट्रवादीला फटकारलं -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


नवी दिल्ली।
'घोटाळा करून बसलेली लोक आता तपास सुरू झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणत आहे. त्यांचा देशाच्या तपास यंत्रणेवर विश्वास नाही' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांवर निशाणा साधला.

पाच राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपच्या मुख्यालयात विजय सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरून पंतप्रधानांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केला.

'भ्रष्टाचार मोठी समस्या आहे. घोटाळा करून बसलेली लोक आता तपास सुरू झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणत आहे. त्यांचा देशाच्या तपास यंत्रणेवर विश्वास नाही. आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला आणि आता तपास सुद्धा होऊ देत नाही. तपासापासून लक्ष दूर करण्यासाठी जातीपातीचे राजकारण करत आहे, असं मोदी म्हणाले.

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post