विदेशी व देशी आड्यावर कुंटूर पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांची धाड -NNL


नायगाव, दिगंबर मुदखेडे|
शासनाने धुळीवंदनेच्या दिवशी सर्वत्र सुट्टी जाहीर केली असताना व देशी दारूचे दुकाने बंद करण्याचे आदेश असताना परवाना धारक देशी व विदेशी दारूचे दुकानटून बेकायदेशीर दारुयची विक्री केली जात आहे. विदेशी व देशी दारू आड्यावर कुंटूर पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांची धाड टाकून कार्यवाही केल्याने दारू विक्रेत्याच्या एकाच खळबळ उडाली आहे.  

शासनाने धुळीवंदनेच्या दिवशी सर्वत्र सुट्टी जाहीर करून दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना आदेशाला केराची टोपली दाखवून नायगाव व परिसरात अवैद्यरित्या देशी- विदेशी दारूची विक्री होत आहे. याची गोपनीय माहिती मिळताच नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी मौजे कृष्णूर येथील रहिवासी असलेले व्यंकटी दत्तात्रय जाधव यांच्या घरा समोरील बाजूला असलेल्या आडोशाला आरोपी सदाशिव व्यंकट जाधव, राजेश कदम यांच्या दुकानावर धाड टाकली. विना परवाना विदेशी दारू विक्री अवैध रित्या करीत असलेल्या ठिकाणी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या आदेशानुसार फौजदार संजय आटकोरे यांच्यासह बिट जेमादार संतोष कुमरे यांनी टाकून आरोपीना ताब्यात घेतले असून, हि कार्यवाही दिनांक १८ मार्च २०२२ रोजी करण्यात आली आहे.

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कृष्णूर येथे मारलेल्या पहिल्या धाडीत ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय आटकोरे यांच्या सुचनेनुसार बिट जेमादार संतोष कुमरे, जीप चालक सदाशिव पाटील,पॉ का अशोक घुमे, होमगार्ड शिंदे, होमगार्ड पांचाळ यांनी आरोपी सदाशिव व्यंकट जाधव, राजेश कदम यांच्या कडून विदेशी दारूच्या एकूण २३० बॉटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत ३० हजार १२० रुपये एवढी असून दुसऱ्या एका देशी दारूच्या धाडीत ९३ दारूच्या बॉटल तर त्यांची किंमत पाच हाजर ५८० रुपयाचा तर एकूण ३५,७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बिलोलीचे दारू बंदी अधिकारी हे असून अडचण नसून खोंळबा असल्याचे जनतेतून बोलल्या जात असून कोणत्याच विना परवाना देशी दारूच्या आड्यावर अथवा विदेशी दारूवर धाड मारून कार्यवाई करीत नसतात त्यामुळे दारू बंदी अधिकारी कोमात कुंटूर पोलिस जोमात असल्याचे ही सदरील जनतेतून बोलल्या जात असून याच गावात म्हणजे कृष्णुर येथे दुसऱ्या एका देशी दारूच्या धाडीत कुंटूर पोलिसांनी गडगा येथील रहिवासी असलेले व हल्ली मुक्काम कृष्णूर येथे राहत असलेले सुधाकर व्यंकटी बाईनवाड यांनी विना परवाना देशी दारू बाळगून विक्री करीत असताना कुंटूर पोलिसांनी मारलेल्या धाडीत एकूण विना परवाना देशी दारूच्या ९३ बॉटल्या ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार एस एम कुमरे, पॉका अशोक घुमे यांनी जप्त केले असून त्यांची किंमत एकूण ५ हजार पाचशे ८० रुपये एवढी असून सदरच्या ही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिसाच्या धाडीत एकूण ३५ हजार ७०० रुपयाची विदेशी दारूसह देशी दारु जप्त तीन आरोपी ताब्यात असून आरोपी ही कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पहिल्या धाडीतील फिर्यादी फौजदार संजय आटकोरे दुसऱ्या धाडीतील फिर्यादी पॉका अशोक घुमे असून या घटनेचा तपास सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुमरे हे करीत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी