हिमायतनगर तालुक्यातील खडकी- टेंभी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, 3 गंभीर -NNL

तीन जण गंभीर जखमी असलेल्याना उपचारासाठी नांदेडला हलविले 

हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यातील मौजे खडकी टेंभी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेेेत 1 विद्यार्थी युवक ठार झाला असून, 3 जन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्नालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने तातडीने नांदेडला हलविण्यात आले आहे. 

हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका कारणे दुचाकीला उडवल्याने तिघा जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण विसरन्यापुर्वी आज दिनांक 18 मार्च रंगपंचमीच्या दिवशी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. एक दुचाकी ही टेंभी गावाकडून येत होती तर दुसरी दुचाकी हिमायतनगर मार्गाकडून खडकीकडे जात होती. टेंभी रस्ता व खडकी फाटा जवळ येताच भरधाव वेगात असलेल्या या दोन्ही वाहनांची समोरा- समोर जबर धडक होऊन विशाल विष्णू इंगळे वय 16 वर्ष राहणार जनता कॉलनी,  हिमायतनगर हा ठार झाला असन, सुरज संजय हरडपकर वय १९ वर्ष रा. परमेश्वर गल्ली हिमायतनगर, पिंटू हट्टू राठोड वय ३५ वर्ष रा.रामेश्वर तांडा, सुधाकर जाधव वय ३० वर्ष रा.रामेश्वर तांडा हे तीन जन गंभीर जखमी झाले आहेत.


ही धडक एवढी गंभीर होती की, दोन्ही दुचाक्या जवळपास शंभर फूट दूर अंतरावर जाऊन पडल्या. त्यापैकी एक वाहनधारक तर १० फूट रस्त्याच्या खड्ड्यात उडून पडला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर दुसऱ्या वाहनावरचे दोघे व अन्य एक जण खाली पडून त्यातील विशाल इंगळे हा युवक रुग्णालयात दाखल करेपर्यंत मयत झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याने अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव पडल्याचे पहावयास मिळाले. या जखमींना उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपस्थित नागरिकांनी वाहनातून आणले. या घटनेचे वृत्त लिहिपर्यंत तीन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. जखमीमध्ये सुरज हारडपकर, वय 18 श्री परमेशवर गल्ली, हिमायतनगर येथील राहणारा असून, पिंटू हट्टू राठोड वय ३५ वर्ष रा.रामेश्वर तांडा, सुधाकर जाधव वय ३० वर्ष रा.रामेश्वर तांडा हे तीन आहेत.  

एकीकडे सर्वत्र होळी धुळवडीचा उत्सव आनंदाने साजरा होत असताना हिमायतनगर तालुक्यात पुन्हा आज एक अपघात घडला आहे. त्यामुळे हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्ग अपघाताचा मार्ग बनला असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने स्टॉपेज असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच  फाट्यावर स्पीड ब्रेकर बसवावे आणि दोन्ही रस्त्याच्या मधोमध डीवाईडर करून, हेल्मेट वापरण्याच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी विशेष मोहीम राबवून भविष्यात होणारे  अपघाताला थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. अशी रास्त मागणी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांतून केली जात आहे.

हिमायतनगर शहरातील मयत विशाल हा युवक आपल्या चर्मकार व्यवसाय करीत शिक्षण घेत होता. इयत्ता १० विची परीक्षा सुरु झाल्याने कालच त्याने १० विचा पहिला पेपर दिला होता. आज धुळवड असल्याने मित्रांसोबत धुळवड खेळून अन्य मित्राच्या भेटीसाठी जात होता. मात्र अचानक काळाने घाला घातला आणि या अपघातात विशालचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण चर्मकार समाज बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हिमायतनगर शहरावरही दुःखाचे सावट आहे. हि घटना घडल्यानंतर शहरातील अनेकांनी धुळवड खेळणे थांबविले होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी