लोहा कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे - प्रवीण पाटील चिखलीकर -NNL


लोहा|
विधानसभा निवडणुकीत चूक झाली त्याची आता पुरावृत्ती होणार नाही लोहा कंधार तालुक्यातील जनतेनी नेहमीच जिल्ह्याचे खा चिखलीकर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ दिली आहे. येत्या निवडणूकीत सर्व ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवू एकजुटीने भाजपाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कार्यकर्ता व जनता हीच खरी ताकद आहे यापुढेही आपले सहकार्य व आशीर्वाद आमच्या सोबत असतील असा विश्वास युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

दापशेड येथे सोनखेड व वडेपुरी या गटातील कार्यकर्त्यांचा  "स्नेह संवाद - कार्यकर्ता मेळावा" जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप कंदकुर्ते युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा जिप. सदस्या सौ प्रणिता ताई देवरे चिखलीकर, पस. सभापती आनंदराव पाटील शिंदे,  उपसभापती नरेंद्र गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बळी पाटील जानापुरीकर माजी सभापती शंकर पाटील ढगे माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके नांदेड दक्षिणचे अध्यक्ष सुनील मोरे हौसाजी कांबळे, संयोजक सरपंच  भद्रीनाथ राजूरे यासह मान्यवर उपस्थित होते. 

जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रातील भाजप सरकार तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय लोकांच्या हिताचे राहवत ते घरोघरी जाऊन सांगणेआवश्यक आहे त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी हे काम केले पाहिजे जि प मध्ये भाजपाची सत्ता येणार आहे असा दावा त्यांनी केला या भागाचे आमदार कोण आहेत हेच कळेनासे झाले अशी टीका त्यांनी केली.

लोहा कंधार चे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले विद्यामान आमदार यांचा नामोउल्लेख टाळत त्यांनी जोरदार फटाके बाजी केली. या दोन्ही  तालुक्यातील जनतेनी कार्यकर्त्यांनी आम्हाला नेहमीच साथ दिली त्यामुळेच आज चिखलीकर साहेब जिल्ह्याचे खासदार होऊ शकले नेहमीच ही साथ राहणार आहे आपण एकाच कुटुंबातील आहोत. असे भावनिक साद घालत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राणिताताई देवरे  सभापती आनंदराव पाटील, माजी उपसभापती  बोडके, भद्री राजूरे यांची भाषणे झाली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी