बारदाणा अभावी हरभरा खरेदी बंद,शेतकऱ्यांना तात्काळ बारदाना उपलब्ध करून द्या -NNL

जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याकडे भागवत देवसरकर यांची मागणी


नांदेड।
शासन हमी भावाने हरभरा खरेदी करत असल्यामुळे व बाजारभाव हरभऱ्याला कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नियमानुसार ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर शासकीय खरेदी केंद्रावरून msg आल्यावर हरभरा विक्रीसाठी जात आहेत. त्यात हदगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या ढिसाळ नियोजनामुळे व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे गेल्या आठ दिवसापासून बारदाना अभावी शासनाची हरभरा खरेदी बंद आहे. हदगाव तालुक्याला तात्काळ बारदाना देऊन खरेदी त्वरित सुरू करावी अन्यथा जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे.

तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी ट्रॅक्‍टरद्वारे हरभरा घेऊन खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर आले आहेत,त्यातच मागील अनेक दिवसापासून बारदाना नसल्यामुळे खरेदी बंद आहे,सदरील ट्रॅक्‍टर जागेवरच उभे आहेत या ट्रॅक्टरच्या भाड्याच्या शेतकऱ्यांना भुर्दंड पडत आहे,खरेदी केंद्राच्या समोर खुले पटांगण असल्यामुळे आपला माल जतन करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवस-रात्र डोळे फाडून थांबावे लागत आहे,शेतकऱ्याचे बारदाना अभावी अतोनात हाल होत असून जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी याबाबत तात्काळ लक्ष देऊन सोमवारपर्यंत हदगाव तालुक्याला बारदाणा द्यावा अन्यथा मंगळवारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ही भागवत देवसरकर यांनी दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी