संतुलित जीवनासाठी वाचन संस्कृती मोलाची - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत -NNL

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप


नांदेड|
संतुलित जीवनासाठी वाचन संस्कृतीचे अनन्य साधारण महत्व आहे. व्यक्तीमत्वाचा विकास हा शारिरीक श्रम, योगा, विपश्यना यासह ज्यांनी वाचनाची सवय लावून घेतली आहे ते विद्यार्थी/युवक कोणत्याही क्षेत्रात आपला अपुर्व ठसा उमटविल्याशिवाय राहत नाहीत असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  अविनाश राऊत यांनी केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने आयोजित श्रम संस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी प्राचार्य एम. एस. बिरादार, नेहरू युवा केंद्राच्या  जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंद्रा रावळकर,  प्रबंधक श्रीमती यशोदा राठोड, राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रम अधिकारी मोहन कलंबरकर, योगाचार्य रमेश केंद्रे, गट निदेशक श्रीमती इंदिरा रणभिडकर, विकास भोसीकर, रवी वानखेडे यांची उपस्थिती होती.

योगासनाच्या नित्य साधनेतून सामर्थ प्राप्त होते. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता वाढते. अनेक योगी, साधुनी यातून सिध्दी प्राप्त करुन दाखविली आहे. युवकांनी यासाठी सातत्यपुर्ण पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या अभ्यासासमवेत आरोग्याकडेही तेवढ्याच गंभीरतेने पाहणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. युवकांमध्ये ग्रामीण भागाशी एकरुप होवून तांत्रिक श्रमदान करण्याची आवश्यकता आहे. सर्वच विद्यार्थ्यांना तंत्र कुशलता शिकण्याची संधी मिळत नाही. ही संधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना मिळते. या ज्ञानाचा गावासाठीही  अधिक उपयोग झाला पाहिजे अशी अपेक्षा प्राचार्य बिरादार यांनी व्यक्त केले.

सहा दिवस चाललेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात योगाचार्य रमेश केंद्रे यांनी युवकांना प्राणायम, ध्यान, सुर्य नमस्कार यातून व्यक्तीमत्त्व विकासाचे  धडे दिले.  श्रम संस्कार शिबिर उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या प्रशिक्षणार्थीचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  अविनाश राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मो. सिब्तैन, विवेकानंद पांचाळ, नागेश कानशेटे, कृष्णा कदम, रोशन ऋतूराज, श्रषीकेश पंढरे, विजय खंडागळे यांना विशेष कार्य केल्याबद्दल प्रशिक्षणार्थी वैष्णवी चव्हाण,  रंगारंग कार्यक्रमात उत्कृष्ट गीत गायल्याबद्दल शेख आफरिन हिचा सत्कार करण्यात आला. श्रम संस्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऊप प्राचार्य सुभाष परघने, श्रीमती प्रबंधक यशोदा राठोड, उमाकांत बिहाऊत, श्रीमती संगीता राठोड,  श्री. सोलेवाड , गजानन मस्के, श्रीमती निकम मॅडम  परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी