राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा-प्रा.डॉ. लक्ष्मण शिंदे


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आयोजित केलेल्या आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत पर्यावरण नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारतासाठी विशेष वार्षिक शिबीर श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको नांदेड व वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड आणि सामाजिक शास्त्रे संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिरात बौद्धिकपर कार्यक्रमात प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे व प्रा.डॉ.शंकर विभुते हे होते.

डॉ. लक्ष्मण शिंदे हे अंधश्रद्धा निर्मूलनात युवकांची भूमिका या विषयी बोलताना पुढे म्हणाले की, भारत देश तरुणांचा देश आहे, तरुणांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे. समाजातील घातक रूढी, परंपरा युवकांनी पाळू नयेत. महिलांमध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण जास्त आहे. शिक्षणाच्या अभावी महिला अंधश्रद्धेला बळी पडतात. कोरोनाचा सामना आपण कोरोना लसीमुळे केला, विज्ञानाने आपणाला वाचवले आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे कार्यकारणभाव असतो तो युवकांनी जाणून घ्यावा. मुलींमध्ये मंगळ आहे, असे आपण म्हणतो ते खोटे आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घ्या, असे सांगितले. शिक्षणामुळे खूप समस्या कमी होतात, माणूस विवेकबुद्धीने वागतो. अनिष्ट रूढी-परंपरांमुळे अंधश्रद्धा वाढते, समाज मागे पडतो, तेथील लोकांचा विकास होत नाही. त्यामुळे क्रूर रूढी-परंपरांच्या विरोधात युवकांनी काम करावे, असे सांगितले.

यानंतर प्रा.डॉ.शंकर विभूते यांनी श्रम संस्कार या विषयावर मार्गदर्शन करताना म्हटले की, वाईट-चांगल्यातून माणूस घडत असतात, ऐकण्यातून माणूस घडत असतो, वाचनाने आकार मिळतो, भाषणाने बोलण्याची कला प्राप्त होते, आयुष्यात कधीकधी संकटे येत असतात पण त्याला घाबरून खचून जाऊ नये, त्याचा मनापासून स्वीकार करून त्याचा सामना करून त्या संकटाला मात देणे हेच खरे आयुष्य आहे. माणूस जन्मल्यानंतरचा श्वास आणि शेवटचा श्वास या मधील अंतर म्हणजे आयुष्य जीवन आपण कसे जगतो हे महत्त्वाचे आहे, से त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.पंडित चव्हाण, डॉ. व्ही.आर.राठोड, प्रा.डॉ.दिलीप काठोडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिभा लोखंडे, डॉ.शिवाजी शिंदे,डॉ.साहेबराव शिंदे,डॉ.मोरे, प्रा.कपिल इंगोले, प्रा.दराडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पतंगे यांनी केले, तर आभार सेवालाल राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राजश्री चंलावार, गीता आचेवार, स्नेहल सरोदे, जुनेद शेख,बाबुजी पवळे, जनार्दन नामोळे, हनुमान मैठे, राजू ढगे,अविनाश राठोड, चितळे सेवालाल जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी