लातूरला शैक्षणिक केंद्र म्हणून जो लौकिक मिळाला तसाच लौकिक क्रीडा क्षेत्राचे केंद्र म्हणूनही मिळेल असा प्रयत्न करु – पालकमंत्री अमित देशमुख -NNL

जिल्हा क्रीडा संकूल येथे विविध क्रीडा प्रकारासाठीच्या सोयीसुविधा उभारून बहूउददेशीय क्रीडा संकूल म्हणून नावारूपाला आणले जाईल


लातूर|
लातूर जिल्हा क्रीडा संकूल येथे अनेक सोयीसुविधा असल्या, तरी त्यात अनेक सुधारणा करून आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नियोजन करून हे क्रीडा संकूल बहुउद्देशिय क्रीडा संकूल म्हणून नावारूपाला आणले जाईल, असे सांगून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या क्रीडा वैशिष्ट्यानुसार एक बृहत अराखडा तयार करावा. जेणे करून तशा प्रकारच्या सुविधा निर्माण करता येतील, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज केले.

पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज लातूर जिल्हा क्रीडा संकूल येथे जाऊन तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधी समवेत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रिडा अधिकारी मदनलाल गायकवाड, मोईज शेख, ॲड. किरण जाधव,ॲड. समद पटेल, गणपतराव माने, शाहूराज बिराजदार, देवीदास पाटील, आतिक कादरी, परवेज शेख,अंकुश पाटील, पद्माकर फड, गोविंद पवार, सिकंदर पटेल, महेश उगीले, कमलेश ठक्कर, यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी,क्रीडा संघटना प्रतिनिधी सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, सद्या जिल्हा क्रीडा संकूल येथे अनेक सोयी - सुविधा असल्या, तरी त्यात अनेक सुधारणा करणे किंवा त्यामध्ये आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. क्रीडा संकूलात विविध क्रीडा प्रकारासाठीच्या आवश्यक सोयीसुविधा उभारून क्रीडा संकूल बहूउद्देशिय क्रीडा संकूल म्हणून नावारूपाला आणले जाईल. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खेळाचे वेगवेगळे वातावरण आहे. त्या त्याक्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या वैशिष्ट्यानुसार एक बृहतअराखडा तयार करावा, जेणे करून तशा प्रकारच्या सुविधा निर्माण करता येतील.

लातूर हे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे, आता लातूरला क्रीडा स्पर्धेचे केंद्र म्हणून नावारूपाला आणले जाईल. यासाठी येथील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पोर्ट कॅलेडर तयार करून क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जावे. त्यासाठी आवश्यक ते प्रायोजक उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. येथील खेळाडूसाठी क्रीडा स्पर्धा आयोजना बरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू लातूर येथे यावेत यादृष्टीने वर्ष दोन वर्षातून येथे स्पोर्ट स्पेस्टीव्हलचेही आयोजन करावे. क्रीडा क्षेत्रात करीअर घडविण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या केवळ या क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था निर्माण व्हाव्यात. यासाठी आवश्यक ती मदत शासनाकडून दिली जाईल.

लातूर येथे जिल्हा क्रीडा संकूला बरोबरच शहराच्या अनेक भागात विविध प्रकारचे स्पोर्ट कॉम्पलेक्स उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, कव्हा येथील विभागीय क्रीडा संकूलात कोणत्या प्रकारच्या सुविधा उभाराव्यात यासाठी क्रीडा संघटनाकडून सुचना मागवाव्यात, क्रीडा संघटनानी आज केलेल्या सुचनासह ज्या संघटना आज उपस्थित नाहीत, त्यांच्याही सुचना घेऊन् त्यांचा त्यासंबधीचा एकत्रित अहवाल सादर करावा आदी निर्देश पालकमंत्री अमित देशमुख या बैठकी दरम्यान दिले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी