नांदेड| ६ मार्च रोजी....यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईच्या विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने राजभाषा मराठी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी मराठी साहित्यातील जेष्ठ कवी अनुवादक तथा अभ्यासक..प्रा डॉ. भगवंत क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
येथील प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय संजीवन हाॅस्पिटल वामननगर येथे सायंकाळी पाच वाजता... संपन्न होणार असलेल्या या कार्यक्रमात...गंध कवितेचा.... अर्थात प्रिय कविच्या आवडत्या कवितांचा स्मरणगंध हा आगळावेगळा उपक्रम संपन्न होणार आहे...या उपक्रमात सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका डॉ वृषालीताई किन्हाळकर.... डॉ पॄथ्वीराज तौर.. उपक्रमशील अध्यापक कवी... शिवाजी आंबुलगेकर यांचा सहभाग राहणार आहे... तरी साहित्य रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईच्या विभागीय केंद्र नांदेडचे सचिव शिवाजी गावंडे यांनी केले आहे.