हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या दीक्षाभूमी कोल्हापूर -धनबाद एक्सप्रेस गाडी न. 11045 - 1046 ला हिमायतनगर रेल्वे स्टेशन वर थांबा, रेलवे स्टॉपेज मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षपासून मागणी केली जात आहे. मात्र अद्यापही हि मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आपण तरी या मागणीकडे लक्ष घालून हिमायतनगर येथे कोल्हापूर - धनबाद एक्सप्रेसला थांबा देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर पर्यंत पूर्ववत करून, पूर्णा - पाटणा गाडीला पूर्वीच्या वेळेनुसार सोडण्यात यावे आणि नांदेड - बिकानेर - गंगानगर आणि राजा राणी एक्सप्रेस गाडी आदिलाबाद पर्यंत सोडण्यात यावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे येथील जेष्ठ नागरिक मुलचंद पिंचा, यांच्यासह येथे कार्यरत असलेल्या अनेक शिक्षक मंडळींनी खा.हेमंत पाटील याना निवेदन देऊन केली आहे.
हिमायतनगर हे तेलंगणा - विदर्भाच्या सीमेवर वसलेले तालुक्याचे गाव आहे. येथे शेकडो वर्षापूर्वीचे हेमाडपंथी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान तीर्थ क्षेत्र आहे. हिमायतनगर पासून विदर्भ सीमा 6 किमीवर आहे. तर तेलंगणा सीमा 12 किमीवर आहे. हिमायतनगरच्या आजू बाजूला 109 खेडे विभागाचा परिसर आहे. या तालुक्यात सर्व समाजाचे लोक राहतात, त्यामुळे येथे स्टॉप दिल्यास प्रवाशांना कोल्हापूर देवीचे दर्शन, पंढरपूर विठठलाचे दर्शन, बार्शीला भगवंताचे मंदिराचे दर्शन तसेच बार्शी येथे मोठे कॅन्सर हॉस्पिटल आहे. तसेच तुळजापूर देवीच्या दर्शनाला उस्मानाबाद हून जाता येते. परळी येथे 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहुरला रेणुका देवीचे दर्शनासाठी किनवट वरुण जाता येईल. यापुढे आदिलाबाद वरुण गडचांदा चंद्रपूर देवीचे दर्शन, सेवाग्रामला आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम आहे. या रेल्वेचे टाईम योग्य असल्यामुळे नागपूरला सकाळी पोहचते. तसेच पुढे मोठे म्हणजे प्रयागराज दीनदयाळ उपाध्याय वाराणसी, बोध्द गया क्षेत्र, जैन धर्माचे तीर्थक्षेत्र पारसनाथ सम्यक शिखर व प्रयगराज या सर्व तीर्थ क्षेत्रांना जोडण्यासाठी हिमायतनगरला मिनिटंचा थांबा दिल्यास सर्वांसाठी उपयुक्त होईल.
नांदेड हुन गाडी सुलटल्यानंतर 160 किमीवर थांबते. त्यामुळे हिमायतनगर सेंटर स्टॉप असल्यामुळे येथे कोल्हापूर - धनबाद एक्स्प्रेसला स्टॉप दयावा. या स्टॉपमुळे हिमायतनगर हुन पंढरपूर व नागपूर जाणाऱ्या प्रवाशाना योग्य टाईम आहे. त्यामळे रेल्वेला त्याचा अवश्य आर्थिक फायदा होईलच रेल्वेचे धोरण तीर्थ क्षेत्रास जोडण्याचे असल्याने हे पण साध्य होईल. तसेच उमरखेड - ढाणकी हे हिमायतनगर शहरापासून 25-30 किमी अंतरावर आहे. ते पण हिंगोली मतदार संघात येतात व या गावाच्या प्रवाशाना हिमायतनगर रेल्वे स्टेशन सोईस्कर आहे. हि बाब लक्षात घेऊन आपण प्रयत्न करावा जर येथे थांबा मिळाला तर आपल्या कार्यकिर्दीत हे काल्याचे सार्थक होईल.
याच बरोबर नांदेड - बिकानेर - गंगानगर या एक्सप्रेस रेल्वेला आदिलाबाद येथून सोडण्यासाठी प्रयत्न करावा, ट्रेन नंबर 17623 हि राजस्थान , गुजरात, माऊंट अबू कडे जाणारे बरेच प्रवासी हिमायतनगर व परिसरात असतात. या गाडीची पूर्वीची वेळ सकाळी 9:00 वाजता होती. त्यामुळे आदिलाबाद पूर्णा पॅसेंजर ने गेल्यास रेल्वे मिळत असे. पण आता गंगानगर या गाडीचा निघण्याची वेळ सकाळी 06:30 वाजता नांदेड येथून सुटते. त्यासाठी आपल्या भागातील लोकांना 1 दिवस अगोदर जाऊन नांदेडला राहावे लागते आहे. म्हणून आपण यासाठी प्रयत्न करून आदिलाबाद वरुण तरी सोडावी किंवा पूर्वी प्रमाणे सुटण्याचा वेळ ठेवावा.
तसेच नांदेड मुंबई जाणारी राजा राणी एक्सप्रेस गाडी नंबर 17611 नांदेड वरुण रात्री 10:00 वाजता सुटते. हि एक्सप्रेस गाडी आदिलाबाद वरुण सोडण्यास प्रयत्न करावा. कारण ही गाडी मुंबई वरुण नांदेड ला सकाळी 10:00 वाजता आल्यानंतर दिवसभर म्हणजे रात्री 10:00 वाजे पर्यन्त थांबते. म्हणून या एक्सप्रेसला नांदेड वरुण आदिलाबादला आणल्यास आदिलबाद, किनवट, हिमायतनगर भोकर येथील प्रवाश्याना औरंगाबाद - मनमाड - नाशिक - मुंबई येथे जाण्याची सोय होईल व ही एक्सप्रेस गाडी शिर्डी जाणाऱ्या भक्तांसाठी मनमाड पर्यन्त उपयोगी पडेल असेही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर मुलचंद पिंचा, महेंद्रकुमार टेम्भूर्णीकर, शत्रुघन चव्हाण, दिलीप ब्राह्मणकर आदींसह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.