बाराव्या शतकातील समता नायक, महान क्रांतीकारक आद्य लोकशाही संसदेचे जनक, समाजसुधारक, क्रांतीज्योती, जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळयाची विटंबना दि. 08 मार्च रोजी शिवा सिध्देश्वर महादेव मंदिर, बजाज नगर जिल्हा संभाजी नगर औरंगाबाद मध्ये घडली. आपल्या देशात आपण सर्वच महापुरुषांचा आदर करतो.
बजाज नगर जिल्हा संभाजी नगर औरंगाबाद येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळयाची तोडफोड करुन विटंबना करणारी घडलेली घटना ही आपल्या लोकशाही देशात अतिशय संतापजनक व सामाजिक लोकशाही आणि मानवतेला काळीमा लावणारी असुन संबंधित गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कैलास भोकरे याला अटक करुन त्याला मोका कायद्यांतर्गत कार्यवाही करुन हद्दपार करावे व MIDC च्या खाली जागा हडपण्यासाठी मदत करणाऱ्या MIDC च्या अधिकाऱ्यांची कसुन चौकशी करुन त्यांना निलंबीत करावे.
या घटनेचा मुदखेड तालुका शिवा संघटना व वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर प्रेमीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे व गुन्हेगारांना कडक शासन करुन हद्दपार करण्याची मागणी करत निवेदनकर्ते तथा तालुकाध्यक्ष प्रकाशराव कांचनगिरे, परमेश्वर भिमेवार, विलासराव कापसे, श्रीराम कोरे, प्रभाकरअप्पा भिमेवार, काशीनाथआप्पा मुलंगे, नामदेव बिच्चेवार, गजानन कहाळे, कैलास आमदुरकर, सदाशिव तांडे, मारोतरावजी कांचनगिरे, आकाश कांचनगिरे, नारायण नरडेले, गोविंद गोपनपल्ले, बाबजी चंद्रे, शिवकुमार देशमुख, गजानन मठपती यांसह तालुक्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला.