लोहा| शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात इयता दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शाळेचे मुख्याध्यापक डी ई वडजे यांच्या उपस्थितीत पार पडला. गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक प्रसिद्ध निवेदक बी एन गवाले यांनी शाळेच्या वाचनालयासाठी पुस्तके भेट दिली.
इयता दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभासाठी शाळेचे मुख्याध्यापक डी ई वडजे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती शिक्षक पगारदार पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, डॉ याकूबखान उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलतान खान, क्रीडा शिक्षक दिलीप कहालेकर, हरिहर धुतमल, सौ यु आर सराफ, ब्रँच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमाम लदाफ उपस्थित होते.
इयता नववी चया विद्यार्थ्यांनी दहावी वर्गास निरोप दिला यावेळी आपले अनुभव विद्यार्थ्यांनी शेअर केले.शाळेचे मुख्याध्यापक डी इ वडजे यांनी तसेच वर्ग शिक्षक बालाजी गवाले, हरिभाऊ चव्हाण, हरिहर धुतमल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .श्री गवाले यांनी शाळेच्या वाचनालयासाठी पुस्तके दिली त्याबद्दल त्यांना सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शब्बीर शेख यांनी केले यावेळी आर आर पिठ्ठलवाड , गुद्धे व्ही एस, पवार, आर आर पारेकर , शेटे एस आर, श्रीमती आढाव सौ, मीनाताई कळकेकर, विठ्ठल वडजे, सौ, आर एन शेडगे, व्यंकट पवार , श्रीमती खरात याची उपस्थिती होती.