उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच ३ कि.मी.अंतरावरील नांदेड, उस्माननगर कंधार राष्ट्रीय महामार्ग रोडवरील तांबोळी मगदूम नुरखा लाईनमन यांच्या शेतात दि.१७ मार्च ते २० मार्च दरम्यान सैलानी बाबा यांचा उर्साचे (यात्रा) चे आयोजन करण्यात आले आहे.
बुलढाणा जि. येथे दरवर्षी सैलानी बाबा यात्रा भरविण्यात येत आसते.पण मागील दोन वर्षांपासून देशात कोरोना या रोगाने थैमान घातले होते.या रोगाने नागरिक आजारी पडत होते, तर काहीजण मरण पावले होते. यामुळे शासनाने ताळेबंदी जाहीर केल्यामुळे देशात कुठेही उत्साव, यात्रा, कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली नाही.दरवर्षी उस्माननगर येथील बाबा ईस्माइल तांबोळी हे भक्तांना सैलानी बाबा उर्ससा घेऊन जाऊन दर्शनास घेऊन जातात.
पण मागील दोन वर्षांपासून सैलानी बाबा यात्रा भरविण्यात शासनाने बंदी केल्यामुळे भक्तामध्ये नाराजी होऊ नये म्हणून आपल्याच शेतात सदरील उर्ससा (यात्रा) भरविण्याचे ठरविले आहे.ही यात्रा खंड पडू नये म्हणून दि.१७ रोजी होळी पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.नाराळाची होळी पुजून उर्सास प्रारंभ होणार आहे.ही यात्रा चार दिवस चालणार आहे.तरी परिसरातील भक्तांनी सैलानी बाबा उर्ससा उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी अशी मागणी मगदूम नुरखाॅ तांबोळी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.