नांदेड| डॉ.व्यंकटेश काब्दे लिखित ‘युध्द आमचे सुरु’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या दि.20 रोजी रविवारी सायंकाळी साडेचार वाजता शिवाजीनगर येथील नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, चौथा मजला येथे होणार आहे.
नांदेड मनपाचे माजी आयुक्त तथा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार (कोविड-19) दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन होणार आहे. या प्रकाशनाला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे ऑनलाईन शुभसंदेश देणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ.जयश्री पावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, नांदेड मनपा आयुक्त डॉ.सुधीर लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, नांदेड मनपातील कायदा विभागातील ऍड. अजितपालसिंघ हे उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पुस्तकाचे लेखक तथा गोदावरी हार्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे या फाऊंडेशनचे सचिव डॉ.सुरेश भायेकर आणि निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.