हिमायतनगर। हदगाव तालुक्यातील तामसा येथील वैद्यकीय शिक्षण घेत असलेली कु. नेहा संतोष चेपूरवार वय वर्ष 20 हिच्यावर पोटाच्या आजारा संबंधी हैद्राबाद येथील एशिएन इन्स्टिट्युट मध्ये गेल्या आठ दिवसापासून उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीने साथ दिली नसल्यामुळे काल रात्री 01:45 वाजता तिचे दुःखद निधन झाले.
रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी दुपारी 02:00 वाजता तामसा येथील स्मशान भूमीत कु. नेहाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. नेहाच्या अचानक जाण्याने चेपूरवार कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखातून सावरण्याचे ईश्वर त्यांना बळ देवो. आणि नेहाच्या आत्म्याला चीरशांती मिळो हीच कु नेहाला नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली🙏
कु. नेहा संतोष चेपूरवार हि शिक्षणात अत्यंत हुशार होती, तिच्या बुद्धिमत्तेमुळे वडिलांनी तिला डॉक्टर बनविण्यासाठी मेहनतीने कर्नाटक मधील सिंदगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएस च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला होता. तिचे शैक्षणिक वर्ष चालू असताना अचानक तिची प्रकृती बिघडली आणि काळाने घाला घातला. तिच्या अचानक जाण्याने चेपूरवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.