नांदेड येथे हौशीन मराठी नाट्य स्पर्धेला "स्पेस" या नाटकाने सुरवात -NNL


नांदेड|
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला नांदेड येथे २८ फेब्रुवारी पासून सुरवात झाली आहे. 

शहरातील कुसुम सभागृह येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नांदेड महानगर पालिकेचे आयुक्त डॉ . सुनिल लहाने होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता भगत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नाथा चितळे, कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अपर्णा नेरलकर, अध्यक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा नांदेड यांची  उपस्थिती होती.  १४ मार्च पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे परिक्षक म्हणून दिप चहांदे, संजय कुलकर्णी, संगिता परदेशी हे काम पाहाणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना नांदेड केंद्र समन्वयक दिनेश कवडे यांनी केली तर सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केले. 


स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा नांदेड या संस्थेचे 'स्पेस' हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाची निर्मिती अपर्णा नेरलकर यांनी केली होती. लेखक आणि दिग्दर्शक गोविंद जोशी हे होते. या नाटकातील पात्र परिचय स्वाती - मंगल खानापुरे, मोतीराम - गोविंद जोशी, सुरज - रवी सोनवणे, संध्या - मीनाक्षी पाटील, क्रांती - अनुश्री अल्लापूरकर, शरयू - अनुराधा पांडे, प्रिया - राजनंदनी जोशी, आरती - श्रद्धा चनाखेकर, रामभाऊ(तबलावादक) - विवेक भोगले, वेदिका - सुनीता पुजारी, शांकरी - नेहा खडकीकर, गीतांजली- वैशाली गुंजकर, न्यायाधीश - अशोक माढेकर, संवादिनी-प्रमोद देशपांडे, हे होते. तर नाटकाच्या तांत्रिक बाबी मध्ये  नेपथ्य ऋषीकेश नेरलकर, अभिनव जोशी, अमोल गादेकर,अभय तौर यांनी केले  . प्रकाशयोजना अशोक माढेकर, रंगभूषा अर्चना जिरवरकर, वेशभूषा रश्मी वडवळकर, तर संगीत कमलेश सारंगधर, मनीषा गादेकर यांनी दिले .

'स्पेस' मधून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकत हे लेखन माणसाला मिळालेला वेळ, स्पेस, साहित्य व ऊर्जा यांचं अयोग्य मिश्रण वेदनादायी जीवन आहे. व योग्य मिश्रण जीवन उत्सवी आहे. हे वैश्विक सत्य मांडणारी हे नाट्यकृती होती. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. स्पर्धेमध्ये चांगल्या संखेत प्रेक्षकांची उपस्थिती असल्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हि स्पर्धां यशस्वीतेसाठी सुदाम केंद्रे, बळी डीकळे, श्याम डुकरे, अक्षय राठोड, संदेश राऊत, गौतम गायकवाड, निवृत्ती कदम, सुदांषु सामलेट्टी, कपील ढवळे, प्रीतम भद्रे, छाया सरोदे, स्नेहा बिराजदार हे काम पाहात आहेत. 

आज दि. २ मार्च रोजी  सायंकाळी ७ वाजता छत्तरपती सेवाभावी संस्था, उखळी, परभणीच्या वतीने अभिजित वाईकर लिखित सोनाली डोंगरे दिग्दर्शित"कधी उलट कधी सुलट" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. तरी प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहान स्पर्धेचे नांदेड केंद्र समन्वय दिनेश कवडे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी