नांदेड| देगलूर नाका परिसरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे मदिनातुलउलूम हायस्कूल ते मालटेकडी या रस्त्यावर अनेक लोक आपले वाहन व इतर काही तरी वस्तू ठेवून वाहतुकीस व रहदारी अडथळा निर्माण करीत आहे ज्यामुळे विशेषतः शाळकरी मुलांना व सामान्य जनतेस त्रास होत आहे .
या वाटेवर अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांना जास्त त्रास होत आहे. जी वाहने रस्त्यावर उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना व वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अनेक फंक्शन हॉल सुध्दा या रस्त्यावर असल्यामुळे सुध्दा रोजच ट्राफीक जाम होत आहे.
ज्या कारणामुळे वाहतूक व रहदारीस अडथळा निर्माण होत आहे हे सर्व अडथळे रस्त्यावरून हटविण्यात यावेत अशी मागणी ए आय एम आय एम नांदेड महानगर सचिव शेख बशिर लाला यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.