राष्ट्रीय लोकअदालीत १७० प्रकरणे निकाली
हदगाव, शे चाँदपाशा| प्रलंबित प्रक्रणाचा निपटरा करण्यासाठी दि १२ मार्च रोजी हदगावच्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये १७० प्रक्रणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. विविध बँकेचे ६८.२५१३० एवढी रक्कमतडजोडीने वसुल करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबई यांच्या आदेशान्वये जिल्हा सेवा प्राधिकरण नादेड तथा वकील संघ हदगावच्या वतीने राष्ट्रीय लोकआदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन हदगांव तालुका न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र जाधव यांच्या हस्ते तसेच न्यायालयाचे वकील संघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वकील संघाचे अँड धम्मपाल पाईकराव यांनी यांनी राष्ट्रीय लोकआदालतीच मुख्य उद्देश त्याच स्वरुप व फायदे याविषयी मुद्देसुद आलेल्या पक्षकांराना माहीती दिली. जास्तीत जास्त प्रक्रणे तडजोड करुन मिटविण्याचे अहवान ही त्यांनी यावेळी केले.
लोकन्यायालयात पँनल न्यायधीश जितेंद्र जाधव व पँनल सदस्य म्हणुन अँड राजेश पवार, अँड सुरेश मुनेश्वर तर पँनेल दोन वर न्यायाधीश श्रीमती सुविधा पांडे (यावलकर) ह्या होत्या. तर सदस्य म्हणुन अँड श्रीमती रेखा हिवराळे, अँड धम्मपाल पाईकराव यांनी काम पाहीले या राष्ट्रीय लोकआदलतीत प्रलंबित दिवाणी व फौजदारी अशी १०१ प्रकरणे निकाली निघाली तसेच दाखल पुर्व ६९ निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे विविध राष्ट्रीय बँकेचे अनेक वर्षापासुन थकलेले कर्ज यामध्ये स्टेट बँक शाखा हदगाव व तामसा महाराष्ट्र ग्रामीण बँक व तसेच महावितरण कंपनी दाखलपुर्व प्रक्रणात ६८लाख २५ हजार इतकी रक्कम वसुल झाली. यावेळी यशस्वीतेसाठी सर्व विधी तज्ञ पँनल प्रमुख न्यायालयाचे आधिक्षक कर्मचारी शिपाई यांनी सहकार्य केले.