काँग्रेसने रास्ता रोकोचा इशारा देताच हिमायतनगरातील उड्डाण पूल व डिव्हायडरचा प्रश्न आला ऐरणीवर -NNL

सोशल मीडियावर होतेय जोरदार चर्चा...नितीन गडकरींनी मंजूर केल्याप्रमाणे रस्ता करावा..!


हिमायतनगर, अनिल मादसवार|
दि.०५ मार्च रोजी हिमायतनगर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित पूर्ण व्हावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या बाबतचे वृत्त सोशल आणि प्रिंट मीडियावर प्रकाशित होताच विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्यांनी उडाणं पूल कॅन्सल करून रोड बनवायला लावला तेच काँग्रेसचे नेते आज या रोड विरोधात आंदोलन करताहेत....? अश्या शब्दांचा भडीमार सोशल मीडियाच्या माध्यमातून करून हिमायतनगरातील रस्त्यावरील डिव्हायडर आणि उड्डाण पुलाच्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या प्रश्नाला सोशल मीडियावरून भरपूर प्रतिसाद मिळत असून, हिमायतनगर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी केंद्र सरकारचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातून मंजूर केलेला फोर-वे रस्ता, डिव्हायडर आणि उड्डाण पूल निर्माण करावे. आणि विकासाच्या मार्गावर हिमायतनगर शहराला आणून हायटेक सिटीचा दर्जा द्यावा अशी रास्ता अपेक्षाही सर्वसामान्य नागरीकातून व्यक्त केली जात आहे.


हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील लोकसंख्या ३० हजारच्या आसपास आहे, एका बाजूला तेलंगणा सीमा तर दुसऱ्या बाजूला विदर्भाची सीमा असून, येथे रेल्वे स्थानक असल्याने शेजारी राज्यातील शेकडो गावचे नागरिक खरेदी - विक्रीच्या व्यवहारासह दूरदूरच्या स्थळाला रेल्वेने जाण्यासाठी येत असतात. मात्र हिमायतनगर येथे जश्या पाहिजे तश्या सुविधा नसल्याने अनेकांना असुविधेचा सामना करावा लागतो. एव्हडेच नाहीतर शहरात बाहेरगावाहून आलेल्या महिलांना प्रसाधनगृह आणि लघुशंकागृह नसल्याने शहरात आडोसा पाहावा लागतो हि शोकांतिका आहे.  येथील बाजारपेठ मोठी असूनही रस्ते आणि शहराचा विकास म्हणावा तसा झाला नसल्याने हिमायतनगर शहराची ख्याती दूरदूरवर असताना देखील नागरिकांच्या मनातील हायटेक शहराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हाती सत्ता दिल्यानंतर हिमायतनगर शहर प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर येऊन शहराचा कायापालट होईल असे सर्वाना वाटले. आणि त्याचा मार्गही मोकळा झाला... केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी धानोडा - माहूर- किनवट- हिमायतनगर - भोकर या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. 


मंजुरी निधी प्रमाणे भविष्यातील २५ वर्ष टिकतील असा रस्ता आणि ज्या शहरातून रस्ता जातो तेथील रुंदीकरण करून येणाऱ्या काळात अपघात होणार नाहीत. यासाठी शहरातून फोर-वे रस्ता, रस्त्यामध्ये १० फुटाचे डिव्हायडर, पेट्रोल पंपापासून उड्डाण पूल आणि रेल्वेपूल करण्यास मंजुरी दिली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना काही मर्जीतील लोकांना सांभाळण्यासाठी शहरातील रस्त्याची रुंदी कमी केली. एवढेच नाहीतर डिव्हायडर गायब करून उड्डाण पूलही रद्द करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. आणि केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या कोट्यवधींचा निधी गिळुंकृत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. असे होत असताना आजी माजी राजकीय नेत्यांनी याकडे दिखाव्यापुरते लक्ष दिल्यानं ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम केले आहे.  म्हणूनच कि काय..? शहरातून होणारा उड्डाण पूल, डिव्हायडर व रुंदी कमी करण्यासाठी काही धनदांडग्या लोकांनी राजकीय नेते, अभियंता आणि गुत्तेदारास हाताशी धरून हा स्वार्थी खेळ यशस्वी करण्यासाठी शहरातून डिव्हायडर, उड्डाण पुलाची आवश्यकता नाही असे पत्र देऊन आपली खेळी यशस्वी करण्याचा खटाटोप सुरु केला आहे. 


खा.हेमंत पाटील यांनी सुद्धा हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे विकासाच्या दृष्टीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. या अगोदर खासदार महोदयांनी हिमायतनगर येथे भेट दिली असता रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी झाली होती. नागरिकांच्या मागणीवरून खा.हेमंत पाटील यांनी तशी सूचनाही संबंधित ठेकेदारास दिल्या होत्या. मात्र ठेकेदाराने कामात कुचराई करून रस्त्यात डिव्हायडरसाठी जागा न सोडता थेट रस्त्याची रुंदी कमी करून शहरातील अर्ध्या रस्त्याचे काम उरकले आहे. त्यानंतर अर्ध्या रस्त्याचे काम रखडत ठेऊन पळ काढला आहे. त्यामुळे नागरिकांना येथून प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत असून, धुळीमुळे तर अनेकांना विविध आजाराला सामोरे जावे लागते आहे. शहराच्या वैभवात भर टाकणारा उड्डाण पूलही रद्द झाला असे सांगत ठेकेदार व संबंधित अभियंता रस्त्याचे काम थातुर मातुर उरकून शासनाचा मंजूर निधी हडप करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना...? असा प्रश्नही जनतेला पडू लागला आहे. आता याकडे हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी मंजुरी प्रमाणे रस्ता, डिव्हायडर, उड्डाण पूल आणि रेल्वे गेट ब्रिज व्हावा यासाठी लक्ष केंद्रित करावे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या नजरेस हि बाब आणून द्यावी जेणे करून हिमायतनगर शहराचा कायापालट होईल आणि ज्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग केला जातोय ते उद्दिष्ट पूर्ण होईल..अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.

दिवसेंदिवस विस्तार होऊ लागलेल्या हिमायतनगर सारख्या शहराच्या दृष्टिकोनातून उड्डाण पूल, डिव्हायडर आवश्यक आहे कि..? नाही हे ठरविणारे हे चार लोक कोण..? खऱ्या अर्थाने याचा विचार करायचा असेल तर थेट हिमायतनगर शहरात जनता दरबार घेऊन डिव्हायडर, उड्डाण पूल करायला पाहिजे कि नाही... यासाठी जनतेचे मत घ्यायला हवे. जेंव्हा उड्डाण पूल, डीव्हाडर रद्द करून रास्ता केला जात असल्याचे लक्षात आल्यावर विविध संघटना कार्यकर्त्यांनी यासंदर्भांत आवाज उठविला. मात्र त्यांचं आवाज दाबण्यासाठी पोलीस कार्यवायसाठी हालचाली केल्या गेल्या हे सर्वश्रुत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही जागरूक पत्रकारांनी वारंवार शहरातील रस्त्याची रुंदी, उड्डाण पूल आणि डिव्हायडरचा प्रश्न वर्तमान पात्र व सोशल मीडियातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठेकेदाराने उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यासाठी केलेला खड्डा बुजवून टाकून मुरूम मिळत नाही असा बहाणा करून वर्षभरापासुन काम रखडत ठेवले आहे. त्यामुळं याबाबतची तक्रार वरिष्ठाकडे गेली आणि ठेकेदार काम पूर्ण करत नसेल तर इतर ठेकदाराला या रस्त्याचे काम सोपवून तात्काळ केंद्रीय मंत्र्यांनी  मंजूर केल्याप्रमाणे रस्ता, डिव्हायडर, उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून शहरच्या वैभवात भर टाकावी अश्या सूचना दिल्या आहेत. आता या सूचनेची अंमलबजावणी केंव्हा होते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.   

शहरातून फोर-वे रस्ता, उड्डाण पूल आणि डिव्हायडर करण्याची मागणी सुद्धा लावून धारावी - दि.०५ रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गातील हिमायतनगर शहरातून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावन्यासाठी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात जबाबदार राजकीय नेत्यांनी हिमायतनगर शहराच्या ५० वर्षांपुढील विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन काम सुरु करण्याबरोबर मंजुरी प्रमाणे शहरातून फोर-वे रस्ता, उड्डाण पूल आणि डिव्हायडर करण्याची मागणी सुद्धा लावून धारावी अशी रस्ता अपेक्षा हिमायतनगर शहरातील विकप्रेमी जनतेतून व्यक्त होत आहे. अन्यथा आगामी निवडणुकांच्या काळात हिमायतनगर शहराला ५० वर्ष पाठीमागे नेल्याचे खापर जनता काँग्रेस व ज्यां पक्षाच्या नेत्यांनी धनदांडग्यांना साथ देण्यासाठी शहरातून उड्डाणपूल, डिव्हायडरची गरज नाही..? असे पत्र आपल्या लेटरहेडवर लिहून दिले त्या पक्षाच्या नावाने खापर फोडून पुढारी म्हणून घेणार्यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत..! असे चित्र हिमायतनगरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या ऐरणीवर आलेल्या प्रश्नावरून पुढे येत आहे. आत्तातरी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन शहराला हायटेक सिटी बनविण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केल्याप्रमाणे फोरे-वे रस्ता, उड्डाण पूल, रेल्वेगेट ब्रिज, आणि डीव्हाडर करून भविष्यात अपघात होणार नाहीत यासाठी रस्त्याची रुंदी वाढऊन घेणे गरजेचे आहे. अन्यथा सध्या चालू असलेल्या रस्त्याप्रमाणे रस्ता झाला तर.... भविष्यात अपघात होऊन त्यात जीव गमावणाऱ्या त्या सर्वांचे पाप मंजुरी प्रमाने काम करण्यात अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेल्याना लागतील यात शंका नाही...?


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी