अर्धापूर,निळकंठ मदने| तालुक्यातील पार्डी म. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असलेले डॉ.पल्लवी फिसके यांना पंचायत समितीच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'उत्सव स्त्री जाणिवांचा' या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व कर्करोग जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती कांताबाई अशोकराव सावंत ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,तहसीलदार उज्वला पांगरकर, जि. प.सदस्या संगीताताई सुनील अटकोरे, माजी सभापती मंगलताई शिवलिंग स्वामी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने आदी उपस्थित होते.
डॉ. पल्लवी अरविंद फिसके कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाच्या विळख्यात संपूर्ण देश होरपळून जात असताना केवळ आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. अनेकांचा जीव वाचविला कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र रुग्णांची सेवा दिली होती. यामुळे अनेक लोकांना स्वास्थ प्राप्त झाले. या महाभयंकर रोगावर आळा घालण्यासाठी जी सेवा दिली त्याबद्दल पंचायत समिती अर्धापुरच्या वतीने डॉ. पल्लवी अरविंद फिसके यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.