रोड लवकर करा अन्यथा आंदोलन करू
लोहा| शहरातील मुख्य चौक ते कंधार पुढे देगलुर मार्गे पुढे राज्य मार्गा असा दुहेरी रोडचे काम गेल्या वर्षा पासून सुरू आहे. परंतु तहसील कार्यालय ते आश्रमशाळा पर्यन्त काम गेल्या चार महिन्या पासून रखडले आहे. या भागात धूळ ..धूळ..आणि धुळच झाली आहे या परिसरात राहणाऱ्या नंदिकेश्वर नगर ,जायकवाडी वसाहतीच्या रहिवाश्याना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
जिल्ह्यातील एका मोठ्या कन्ट्रक्शनचे हे काम आहे आश्रमशाळा पासून पुढे डांबर झाले आहे. पण आश्रमशाळा ते तहसील कार्यालया पर्यन्त दोन्ही बाजूने नाली झाली. पण या भागात सिमेंट रस्ता होणार आहे. दिवाळी पासून संबंधित गुतेदाराने काम पूर्ण केले नाही गुतेदार मोठा त्यामुळे कोणाचेच काही चालना(?) अशी गत झाली आहे.
नंदिकेश्वर नगर, जायकवाडी वासहतीती राहणाऱ्या रहिवाशी या धुळीमुळे त्रस्त झाले असून, त्यांना श्वसनाचा त्रास होतो आहे. या रोडवरील धुळच धूळ थांबवावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा बसव चे हरिहर शेटे, सामाजिक कार्यकर्ते दता शेटे, वंचितचे तालुकाध्यक्ष सतीश आनेराव, कैलास कहालेकर, गणेश भोसीकर यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.