नांदेड| नांदेड-वाघाळा महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, माहे मार्च-2022 या महिन्याच्या वेतनामध्ये 11 टक्के डी.ए.समावेश करावा तसेच 11 टक्के एरिअस डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी देण्यात यावे.
या पूर्वीचा 2021 पर्यंतचे 6 टक्के महागाई भत्याची फरकाची रक्कम तातडीने देण्यात यावी त्याचप्रमाणे मार्च 2022 चे वेतन आंबेडकर जयंतीपूर्वी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशा मागण्या केल्या. यामध्ये बापूराव गोडबोले,लक्ष्मण इंगळे, संतोष गुलमवार, जमील अ.मो.वजीर, मंगेश देशमुख, राजेश सरपलवार, रोहिदास भोसले, श्रीकांत कंदी, अस्फाक अहेमद, राजेश रणवीरकर, दिगंबर कदम, दत्तात्रय भोसले, महमद अजीम, रमेश वाघमारे, विजय कठारे नावे आहेत.