ढाणकी नगर पंचायतसमोर २२ मार्च रोजी भव्य धरणे आंदोलन आयोजित -NNL


ढाणकी|
वार्ड क्रमांक तीन, ढाणकी येथील मोकळ्या जागेवरील हागणदारी बंद करुन ती जागा गुरु रविदास मंदिर व सांस्कृतिक सभागृहासाठी ठरावाद्वारे अधिगृहित करण्यात यावी आणि निधीची तरतूद करुन लवकरात लवकर गुरु रविदास मंदिर आणि सांस्कृतिक सभागृह बांधण्यात यावे या मागणीसाठी मंगळवार दि. २२ मार्च २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता नगर पंचायत समोर, ढाणकी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद शाखा ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळच्या वतीने आयोजित या भव्य धरणे आंदोलन कार्यक्रमात परिसरातील चर्मकार व बहुजन समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती ढाणकी शहराध्यक्ष गजानन सुरोशे तसेच दिपक सुरोशे, संजय पर्तुडे, विष्णू सुरोशे, दत्ता कांबळे, आकाश गायकवाड, अक्षय डोंगरे, शिवाजी सुरोशे, संगीता पर्तुडे, सविता वाघमारे आदींनी दिली.

याबाबतचे निवेदन नगर पंचायतचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. सन २०१६ पासून रितसर अर्ज विनंत्या नगर पंचायत ढाणकी यांना करण्यात येत आहेत परंतु समाजाच्या या मागणीकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले. कांहीं नगर सेवकांच्या सुचनेनुसार नियोजित जागेवर समाजाच्या वतीने पिवळा ध्वज आणि गुरु रविदास महाराज यांची प्रतिमा लावण्यात आली होती, या प्रतिमेची विटंबना करुन नगर पंचायतच्या वतीने ध्वज काढून टाकण्यात आला आणि नंतर गजानन सुरोशे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

नगर पंचायतची ही दडपशाही बंद करुन जागेवर ध्वज नसतानाही दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा रद्द करुन त्या जागेवर नगर पंचायतच्या वतीने ओटा बांधून तो पिवळा ध्वज पूर्ववत लावण्यात यावा, ढाणकी शहरात किती स्मारक, पुतळे, चौक आणि मंदिरे आहेत, त्यांना नगर पंचायतने दिलेल्या परवान्याच्या प्रती सादर कराव्यात या मागणीचाही जोरदार पुरस्कार या धरणे आंदोलन कार्यक्रमातून केला जाणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी