लोहा तालुका, ८४ ग्रामपंचायत निवडणूक खर्च सादर न करणारे २०० उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र -NNL


लोहा|
तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या  उमेदवारांनी मुदतीत खर्च दाखल केला नाही असा१०९ महिला व ९१ पुरुष असा एकूण  २०० उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दिला नाही त्यामुळे दोनशे उमेदवार पाच वर्षा साठी अपात्र ठरविण्यात आले. यात कलंबर बु, माळाकोळी, वाका, सुनेगाव, धानोरा या गावातील उमेदवारांची संख्या अधिकची आहे या बाबतचे पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास व सदस्य होण्यासाठीची निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.

एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत तालुक्यातील ८४ गावात  ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब दाखल केला नाही .निकाल घोषित झाल्याच्या दिनांका पासून तीस दिवसाच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब हमीपत्र देऊन ही सादर केला नाही . त्यामुळे म३,हाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६(२) मध्ये नमूद केले प्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे उमेदवार ज्यांनी मुदतीत खर्च दाखल केली नाही त्यामुळे त्यांची २९जुलै २०२१रोजी सुनावणी झाली व बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती पण १०९महिला व ९१पुरुष असा एकूण२०० जणांनी तो सादर केला नाही.

ग्रामपंचायत व कंसात उमेदवार यात आंडगा(-७ उमेदवार ), रामतीर्थ -३, खांबेगाव -५, देऊगाव-४, पिंपळगाव ढगे-३, झरी-१ हरबळ प ऊ-५, बोरगाव को-१, आंबेगाव-६, बेट सांगवी-४, कारेगाव-२, खडक मांजरी-१, अंत्यश्वर -१, सायाळ भाद्रा-२, शिवानी जामगा-३, सुनेगाव-१२, आडगाव-१, पेनूर-२, हिंदोळा करमाळा-६, डोलारा-४, सुगाव-३,कापशी खु-१, वाळकी खु,- ८, माळाकोळी-१२, पोखरभोसी -४, जवळा दे-३, लोंढे सांगवी-२, किवळा-२, शंभरगाव -जांभरून-५, टाकळगाव -३, डेरला-६, ढाकणी-१, जोमेगाव-१, हलदव-२, कलंबर खु-२, धावरी-५, डोंगरगाव-८, आष्टुर-२, धानोरा शे-२, निळा-१, सावरगाव नसरत-१, गुंडेवाडी-२, कलंबर बु-१८, खेडकरवाडी २, गोलेगाव प क -१, शेलगाव धा -१०, वागदरवाडी-३  असे एकूण २००ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे उमेदवार पाच वर्षांसाठी अनर्ह ठरविण्यात आले आहेत याबाबत तहसीलदार मुंडे, निवडणूक विभागाचे  नायब तहसीलदार संजय भोसीकर, महसूल सहायक निवडणूक विभाग व निवडणूक विभाग प्रमुख जी के पटणे , पेशकार बडवणे यांनी या बाबत प्रस्ताव सादर केला होता 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी