शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार -NNL


नांदेड|
जनतेच्या सोयीसाठी दस्त नोंदणी तसेच इतर कार्यालयीन कामासाठी शनिवार 26 व रविवार 27 मार्च 2022 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 नांदेड क्र. 3 सुरु ठेवण्यात येत आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी कळविले आहे. 

ज्या पक्षकारांनी 31 मार्च 2022 पर्यंत दस्त निष्पादित करुन, सही करुन शासकीय ई-चलन मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कचा भरणा करुन ठेवल्यास त्यांचे दस्त पुढील चार महिण्यापर्यत नोंदणीसाठी विनादंड स्विकारण्यात येतील. वार्षिक मुल्यांकन दरवाढ झाल्यास संबंधितास अतिरिक्त भुर्दड बसणार नाही. त्यामुळे पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात अनावश्यक गर्दी न करता ई-स्टेपइनचा वापर करुन दिलेल्या निर्धारित वेळेत आपल्या दस्ताची नोंदणी करावी व गैरसोय टाळावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी