खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे गोदावरीबाई जोजर यांना मिळाले जीवदान -NNL

कर्करोगाच्या निदानासाठी ३ लाखाची आर्थिक मदत 

हिंगोली/वसमत। रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या वसमत तालुक्यातील गोदावरीबाई संतोष जोजर यांना खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रधानमंत्री राहत कोषामधून ३ लक्ष रुपयाची आर्थिक मदत मिळवून देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करून त्याना जीवदान मिळाले . 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोराळा येथील गोदावरीबाई संतोष जोजर यांना अत्यंत कमी वयात २७व्या वर्षी गंभीर अश्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर अचानक झालेल्या आघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला . एक ६ वर्षाची मुल्गी आणि ४ वर्षाचा मुलाला सोबत घेऊन गोदावरीबाई यांचे पती संतोष यांनी  नांदेड पासून, औरंगाबाद, हैद्राबाद, मुंबई पर्यंतची सर्व हॉस्पिटल पालथी घालून उपचार केले.  

शेवटी मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये यावर खात्रीशीर उपचार करण्यात येतील असे सांगण्यात आल्यावर त्यांनी त्याठिकाणच्या डॉक्टरांना दाखविले . डॉक्टरांनी उपचारासाठी ६ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले . एवढा पैसा आणायचा कुठून या विचाराने संतोष यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला . याच दरम्यान जवळच्या नातेवाईकांकडून पंतप्रधान राहत कोषाची माहिती मिळाली आणि यासाठी लोकप्रतिनिधींची शिफारस लागत असल्यामुळे त्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने याबाबत यंत्रणा कामाला लावून खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यालयाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

आणि अवघ्या १ महिन्यात गोदावरीबाई यांच्या उपचारासाठी ३ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला . व त्यांच्यावर उपचार होऊन पुन्हा त्या आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगत आहेत. वेळेवर मिळालेले उपचार आणि खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळालेली आर्थिक मदत यामुळे माझ्या पत्नीचा जीव वाचला . अशी भावना संतोष जोजर यांनी व्यक्त केली .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी