नांदेड। हनमंतराव निवृत्ती बाजगीरे हे जिल्हा परिषद हायस्कूल तामसा ता.हदगाव येथे,माध्यमिक शिक्षक या पदावर दि.१ जुलै२००६ ते दि.६.एप्रिल २००९ पर्यंत कार्यरत होते. त्यांचा दि.७ एप्रिल २००९ रोजी मृत्यू झाला.
ओमकार हणमंतराव बाजगीरे हा सज्ञान होत (पात्र) असल्याने, श्रीमती शुभांगी हनमंतराव बाजगीरे यांनी सादर केलेला नामांकनासहचा - विहीत नमुण्यातील अर्ज व प्रस्ताव- कव्हरींग लेटरसह मु.अ. जि.प.हा.तामसा ता.हदगाव यांनी जि.प. नांदेडच्या सीईओ कार्यालयास दि.२७ डिसेंबर २०१९ रोजी सादर केला होता.
या प्रस्तावानुसार केलेल्या कार्यवाहीचा पत्रव्यवहार, सीईओ कार्यालयाकडून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी व्हायला हवा होता.किंवा संबंधित मुख्याध्यापकामार्फत श्रीमती शुभांगी बाजगीरे यांचेशी पत्रव्यवहार होणे जरूरी होते. असा कोणताही पत्रव्यवहार न करता थेट (अज्ञान ) ओमकार हनमंतराव बाजगीरे यांचे नावे सीईओ कार्यालयाने दि.२० एप्रिल २०२० रोजी पत्रव्यवहार केला .पण सदर पत्राची प्रतिलिपी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्याची तसदी सीईओ कार्यालयाने घेतली नाही.
सीईओ कार्यालयाकडून उपरोक्त पत्र ओमकार यास प्रत्यक्ष देण्यात आले नसून, सदर पत्राच्या स्थळप्रतीची छायांकित प्रत देण्यात आली.तसेच उपरोक्त पत्रात फक्त सन २००५ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देवून, अर्ज करण्यास अतीविलंब झाल्याचा ठपका ठेवत - 'अनुकंपा तत्वावरील नोकरीचा लाभ देता येणार नाही.' असे नमूद केले.
खरे तर मृत शिक्षकाच्या कुटूंबियास, तत्कालीन संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांंकडून/ प्रशासकीय यंत्रणेकडून दि.२१ सप्टेंबर २०१७ च्या परिशिष्ट ३ मधील (७) (अ) (ब ) मधील नियमानूसार , 'अनुकंपा नौकर तत्वावरील करावयाच्या कार्यवाहीबाबत ' लेखी माहिती ( विशिष्ट काळात ) देणे बंधनकारक असतानाही , अशी माहिती संंबंधित आस्थापना अधिकारी/संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून बाजगीरे कुटूंबियास देण्यात आलेली नाही.
शासन निर्णय दि.२३ ऑगस्ट १९९६ व शासन परिपत्रक, दि.५ फेब्रुवारी २०१० दि.२० मे २०१५ मधील नियमानुसार तसेच दि.२१ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयातील १० आ ,इ मधील नियमानुसार , अनुकंपा तत्वावरील नौकर नियुक्तीच्या प्रतिक्षासूचीत नाव समाविष्ट करण्यास्तव किंवा इतर महत्त्वपूर्ण कार्यवाहीबाबत संबंधित वारसदार ओमकार बाजगीरे यांचा ,जिल्हा परिषदेच्या सीईओ कार्यालयाने विचार केला नाही.
दिवंगत हनमंतराव बाजगीरे यांच्या कुटूंबियाचा वरील शासन निर्णयातील नियमानुसार मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून, त्यांचे वारसदार ओमकार हणमंतराव बाजगीरे यांचे नाव अनुकंपा तत्वावरील नौकर नियुक्तीच्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करण्यात यावे. म्हणून सदर विषयाच्या संदर्भित कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह , 'आस ' शिक्षक संघटनेने जि.प.नांंदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
यावेळी 'आस ' शिक्षक संघटनेचे प्रांताध्यक्ष युवराज पोवाडे, जिल्हाध्यक्ष नईमोद्दीन सय्यद ,जिल्हाध्यक्ष (खा. अनु.) निळकंठ मठपती, जिल्हाध्यक्ष (खा.वि. अनु.) नागोराव जोंधळे , जिल्हा सचिव सुधाकर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय जानते ,जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन उपलंचवार, जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित चौहान, जिल्हा सहसचिव अनिरुद्ध गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.