क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांचे आवाहन
लातूर| खेळाडुंना शासकीय निमशासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण असल्यामुळे काही उमेदवार बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. अशा उमेदवारांना किंवा बोगस प्रमाण पत्र घेऊन सेवेचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना एकसंधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र/बोगस क्रीडा प्रमाण पत्रपडताळणी अहवाल समर्पण योजना" शासनाने जाहीर केली आहे.
या बोगस प्रमाण पत्र उमेदवारांनी 31 मे,2022पूर्वी त्यांच्याकडील बोगस प्रमाणपत्र समर्पित करावीत. अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. या मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्र आणि मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधित उमेदवार तसेच संबंधित क्रीडा संघटना यांच्या विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे लातूर येथील क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी म्हटले आहे.