नगर परिषदेतील प्रभारी राज अखेर संपला
पण शहराला कायमस्वरुपी मुख्याधिकारी असावे अशी अनेकांची ईच्छा होती . याच अनुषंगाने प्रशासनाने धनंजय थोरात यांची नियुक्ती मुखेड नगर परिषदेला केली . धनंजय थोरात हे या अगोदर पनवेल नगर परिषदेत संगणक अभियंता म्हणुन ४ वर्ष काम पाहिलेले आहेत तर वरळी येथील नगर विकास विभाग संचनालय कार्यालय येथे ३ वर्ष काम पाहिलेले आहेत तसेच उरण नगर परिषद जि . रायगड येथे २ वर्ष काम पाहिलेले असुन अशा तीन ठिकाणी ९ वर्ष प्रशासकीय सेवा बजावली आहे . प्रशासकीय सेवेत असतानाच १० टक्के संवर्गातून परिक्षा थोरात यांनी दिली असता या परिक्षेत पास झाल्याने त्यांना मुख्याधिकारी पदी प्रशासनाने नियुक्ती केली आहे.
मुखेड नगर परिषदेत येताच प्रभारी मुख्याधिकारी कर्मचा-यांनी महेश हांडे यांनी व त्यांचा सत्कार केला . यावेळीयु . एम.नारलावार , सुधीर सरोदे, बलभीम सुधीर शेंडगे , अशोक इंद्राळे , राजेश्वर ताटीपामल , शिवशंकर कुच्चेवाड , संतोष साबदे, सत्यजीत रावळे , कैलास यमेलवाड , हरिशपाल कुमरे , वैभव कोळेकर , सागर पडोळकर, ईश्वर फुलवळकर , समीर कुरेशी, भारत गजलवाड , सय्यद हाफीज राज , एस . एम . सोनकांबळे , रफिक बागवान , अन्सारी , गौरव जाधव , गौतम बनसोडे , रमेश कांबळे , दत्तात्रय देबडवार , माधव कांबळे , सुधाकर कांबळे , माया वाघमारे , चंद्रकला गायकवाड , गौतम गवळे , श्याम पोतदार , अभिजित जोशी , गणेश पाटील , जुनेद शेख नवशाद शेख यासह नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
शहरात पाणी , विज व स्वच्छता या मुलभूत सुविधा नागरीकांना वेळेवर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असुन सर्वांच्या सहकार्याने शहरात शासनाच्या विविध योजना राबवून शहराच्या विकासात भर पाडण्याचा प्रयत्न करणार. अशी प्रतिक्रिया धनंजय थोरात, नुतन मुख्याधिकारी, नगर परिषद मुखेड यांनी दिली.