ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नास यश
नांदेड। अर्धापूर तालुक्यातील ३ खाटाच्या ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नास यश आले असून यासाठी १४ कोटी ३२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता लवकरच या ग्रामीण रुग्णालयाचे रुपडे पालटणार आहे. ही सुखदः वार्ता समजताच अनेकांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.
मालेगावचा विस्तार बघता नागरिकांना येथे चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शहरात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले होते यामुळे या भागातील रुग्णांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बहुतांश वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .यानंतर मालेगाव ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करून घ्यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी ना. चव्हाण यांच्या कडे केली होती.
या प्रकरणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आरोग्य अधिकारी यांच्या कडून या बाबतचा आढावा घेतला होता. यानंतर त्यांनी सातत्याने मालेगाव ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठीच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता . या पाठपुराव्यास यश आले असून नुकतेच मालेगाव ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी १४ कोटी ३२ लाख मंजूर करण्यात आले आहे यामुळे आता लवकरच या ग्रामीण रुग्णालयाचे रुपडे पालटणार आहे. ही सुखदः वार्ता समजताच अनेकांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.