शेतकऱ्यांचे विज बिल माफ करा व दिवसा शेतकऱ्यांना किमान सहा तास विज देणे अवश्यक
तसेच विधानसभेत पुढे बोलताना आ. हंबर्डे म्हणाले की
दोन वर्षापासून अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून महा विकास आघाडी सहकार्य करीत आहे .परंतु या सहकार्याने शेतकऱ्यांचे काही सारलं होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कमीत कमी एक वर्षाची विज बिल माफ करण्यात यावी,व रात्रीच्या वेळी शेतात काम करीत असतांना सापाच्या चावामुळे व इतर गोष्टींमुळे शेतकऱ्यावर संकट येतं.
त्यामुळे दिवसा किमान सहा तास लाईट देण्याची व्यवस्था करण्यात यावी ज्यामुळे अश्या दुर्घटना टाळता येतील.
दुसरी गोष्ट म्हणजे नांदेड ची जीवनदायिनी असलेला
विष्णुपुरी प्रकल्प धरण आहे.यास एकूण 18 दरवाजे आहेत.त्यापैकी अठरा नंबर चा दरवाजा हा तीन किलोमीटर खोलीचा आहे. पण तो दरवाजा दहा वर्षापासून उघडला नसल्याने दहा फुटाचा गाळ साचलेला आहे.परिणामी आजूबाजूच्या विहीर आणि बोअरचे पाणी कमी होत आहे.पाचशे फूट जमिनीत पाणी लागत नाही. त्यामुळे हा दरवाजा लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा. असे प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.