भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या उपक्रम
नांदेड| श्री गुरुगोविंदसिंग स्मारक शासकीय रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रात एकही दिवस खंड न पडता दररोज सेवा ही संघटन या उपक्रमांतर्गत भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे कोरोना लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सैनीटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट देण्याच्या उपक्रमाला साडेतीनशे दिवस पूर्ण होऊन एक नवीन विक्रम स्थापन झाला आहे.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड च्या वतीने ही सेवा अखंडितपणे सुरू आहे. 350 व्या दिवशी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी व सविता अरुण काबरा यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लसीकरण देण्याची सुरुवात करत असताना भारतीय जनता पक्षाने एक सप्ताह भर सर्व लसीकरण केंद्रात मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचे आदेश सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना दिले होते.भारतात अनेक ठिकाणी हा उपक्रम आठवडाभर राबविण्यात आला.
काही ठिकाणी महिनाभर सेवा ही संघटन सुरू होते. नांदेडमध्ये मात्र कामाजी सरोदे,अरुणकुमार काबरा, प्रशांत पळसकर, सुरेश निल्लावार,सुरेश शर्मा यांनी परिश्रम घेऊन आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सेवा पुरवली आहे.जोपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे तोपर्यंत ही सेवा नांदेडमध्ये सुरू ठेवण्यात येईल असा निर्धार दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी दिलीप ठाकूर हे घेत असलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.