नांदेड। पिंपळगाव (महादेव) येथील जि.प. हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश धोंडीबा दुधमल यांच्या मातोश्री मालनबाई धोंडीबा दुधमल यांचे आज बुधवार, दि.२४ मार्च रोजी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
मृत्यूसमयी त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मोठे चिरंजीव बालाजीराव, रमेश, चंद्रमणी ही तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मालनबाई ह्या अत्यंत धार्मिक प्रवृत्ती व प्रेमळ स्वभावाच्या म्हणून त्या ख्यातकीर्त होत्या. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांची अंत्ययात्रा दुपारी चार वाजता नांदेड शहरालगत असलेल्या सांगवी येथील सिध्दार्थनगर मधील त्यांच्या निवासस्थाना पासून निघणार आहे. आसना नदीच्या नजिक असलेल्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मालन बाई दुधमल यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.