नांदेड| मिशन काश्मीर फाइल्स या उपक्रमांतर्गत संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून पीव्हीआर सिनेमा मधील एका दिवसाचे सर्व शो मोफत दाखविण्यात आले असून कश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहून निघणाऱ्या शेकडो तरुण-तरुणींनी हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडल्यामुळे राष्ट्रभक्तीचा जनसागर उसळला.
भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेडच्या वतीने सुरुवातीला शहीदी दिनाचे औचित्य साधून भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, ज्योती प्रकाशराव कुलकर्णी तळेगावकर, लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी, नांदेड भूषण राजेंद्र हुरणे, प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा, सतीश बाहेती ज्येष्ठ पत्रकार कृष्णा उमरीकर, शिवा मामडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वेगवेगळ्या शो चे उद्घाटन करण्यात आले.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, महिला जिल्हाध्यक्ष चित्रलेखा गोरे, स्नेहलता जायस्वाल यांच्या हस्ते महिलासाठी व तरुणींसाठी आयोजित केलेल्या विविध स्वतंत्र शो चा शुभारंभ करण्यात आला.पहिला शो ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे, दुसरा शो डॉ. महेश तळेगावकर यांच्यातर्फे तर तिसरा शो एका अज्ञात राष्ट्रभक्तातर्फे मोफत दाखविण्यात आला. इतर शोसाठी सहकार्य करणारे रमाकांत संभाप्पा भंडारे,बाबुराजाजी कचरूलालजी झंवर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम प्रदीपराव बंडेवार,गणेश गंगाधर महाजन,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर व सुमित नरसिंह राठोड, महिला मोर्चा महानगर उपाध्यक्ष सुषमा ठाकूर व पुनमकौर धुपिया, प्रीती सतीशसिंह चौहान, निर्मला द्वारकादास अग्रवाल ,सचिन कांबळे लोण,सागर बंधमवार,किरण लक्ष्मणराव देशपांडे,ॲड.अशोक भुतडा,अंकुश पद्माकर पार्डीकर यांचा शाल व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला.
विविध शोच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. चैतन्य बापू देशमुख, विजय गंभीरे, अनिलसिंह हजारी, डॉ. विजय भारतीया, धीरज स्वामी, सिद्धार्थ धुतराज, शशिकांत देशमुख, कुणाल गजभारे, बिरबल यादव, अरुण अश्टुरकर, संदीप छापरवाल ,कपिल यादव,राजेशसिंह ठाकूर, राधा रवींद्र पाटील, सीमा गंजेवार, अनिल चिद्रावार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मनीषा तिवारी, लता जैस्वाल, निर्मला अवधिया,पुनम चौहान, आम्रपाली इंगोले, तन्वी अवधिया,वेदिका देशमुख यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या आलेल्या सर्व रसिकांचे पुष्पवृष्टी करून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडील यांच्यासह सागर जोशी, अमोल कुल्थिया, सुरेश शर्मा, जयश्री दिलीपसिंह ठाकूर, सविता काबरा यांनी स्वागत केल्यामुळे सर्वजण भारावले. प्रत्येक शो संपल्यानंतर कश्मीरी पंडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संयोजकांच्या वतीने मध्यंतरात नाममात्र शुल्क घेऊन पॉपकॉर्न काढून देण्यात आले. पीव्हीआर सिनेमा चे व्यवस्थापक सरदार जयदेवसिंघ यांच्यातर्फे थंड शीतपेय तसेच दिलीप ठाकूर यांच्यातर्फे चित्रपट संपल्यानंतर अर्धा लिटर चे सैनीटायझर मोफत मिळाल्यामुळे सिनेरसिकांना सुखद धक्का बसला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कामाजी सरोदे, अंकुश पार्डीकर, अरुणकुमार काबरा,सुरेश निल्लावार, आदित्य अश्टुरकर , अभिनव कुलकर्णी, संतोष परळीकर,महेंद्र तरटे, बाळू टोम्पे,अजयसिंह परमार, रोहित ठाकूर यांनी परिश्रम घेतले. पीव्हीआर सिनेमाचे मुख्य व्यवस्थापक सरदार जयदेवसिंघ , अजिंक्य गायकवाड, विनोद धाडेकर, निगम शर्मा, मोहन कुलकर्णी, सचिन चिंतळे, विशाल भालेराव, नंदाप्रिय, प्रकाश भोकरे, गुलाब मोरे, आम्रपाली इंगोले, मीरा पवार, भगवान राठोड यांनी चोख व्यवस्था केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिडको ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांचन कांदे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी चित्रपटगृहात ठाण मांडून होते. पुढील आठवड्यात भाजपतर्फे असाच एक दिवस मोफत काश्मीर फाइल्स दाखवण्याचा मनोदय अशोक पाटील धनेगावकर व अनिलसिंह हजारी यांनी व्यक्त केला. संपूर्ण भारतात अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग दिलीप ठाकूर यांनी अतिशय नियोजनबद्ध पार पाडल्याबद्दल त्यांचे राष्ट्रप्रेमी नागरिकांतून कौतुक होत आहे.