नांदेड| लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या जवळा येथील प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार यांना तालुकास्तरीय गुरू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जि.प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, सभापती आनंदराव शिंदे, उपसभापती नरेन्द्र गायकवाड, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांतील ८९ शिक्षकांना लोहा पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जवळा येथील संतोष घटकार यांनी मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सन्मानित केल्यानंतर जवळ्याच्या ग्रामस्थांनी व शाळेच्या वतीने पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी वर्षा घटकार, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, बालाजी भांगे, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सरपंच साहेबराव शिखरे, माजी सरपंच ग्यानोबा टिमके, आकाशवाणीचे उद्घोषक आनंद गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, नारायण पाटील चव्हाण यांची उपस्थिती होती.
घटकार यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती अम्बलवाड, मुख्याध्यापक आनंद नरवाडे, अशोक राऊत, हिरामण वाघमारे, परशुराम मिरेवाड, लहू पंदलवाड, राहुल बनसोडे, संदीप खरात, प्रदीप सूर्यवंशी, रामदास कदम, विशाल महाबळे, विठूभाऊ चव्हाण, निलेश स्वामी, नागनाथ उपाडे, दत्ता बोइनवाड, शिवाजी मुंडे, बालाजी गायकवाड, संग्राम चिंचोरे, रमेश नादारगे आदींनी अभिनंदन केले आहे.