नवीन नांदेड| प्रत्येक कर्मचाऱ्याला व सामाजिक कार्यकर्त्याला त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा पुरस्कार असतो, आणि यातूनच पुढील भविष्य काळात त्यांना अधिक समाज कार्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांनी केले.
सिडको येथील एन.डी.१२० नालंदा बुद्ध विहारांमध्ये ६ मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील स.उद्यान अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले पांडूरंग सूर्यवंशी यांना दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली तर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक रीत्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले,यावेळी युवा नेते ॲड. प्रसेनजित वाघमारे, सामाजीक कार्यकर्ते राजू लांडगे, पप्पू गायकवाड, संदिप कदम,प्रा, शशीकांत हाटकर यांनी पांडूरंग सूर्यवंशी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल व त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत सावंत, संदीप महाबळे, महेंद्र गवळी, सुमेध बेरजे, प्रकाश सरपाते, विनोद गजभारे, चंदू कांबळे, यांनी केले होते तर. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंढरीनाथ सावळे यांनी केले.