नवीन नांदेड| युवासेनेच्या दक्षिण व नायगाव विधानसभा जिल्हा युवाधिकारी प्रमुखपदी व्यंकटेश मामीलवाड तर जिल्हा समन्वयक नांदेड दक्षिणपदी सुहास खराणे यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल मित्र मंडळी यांनी अभिनंदन करुन फटाक्यांच्या व ढोलताशांच्या गजरात नियुक्तीचे स्वागत केले आहे.
नविन नांदेड भागातील व्यंकटेश मामीलवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबीरातुन अनेक रूगनांचे जिव वाचवले असुन युवासेना माध्यमातून पक्ष वाढविण्यासाठी व आंदोलन ,विकासात्मक कामे या मध्ये सहभाग नोंदविला आहे तर सुहास खराणे यांनी ही शिवसेना ,युवासेनेचा माध्यमातून पक्ष वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या प्रयत्न व सामाजिक कार्यतुन केलेल्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे,युवा सेना सचिन वरून सरदेसाई, सिद्धेश कदम यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्ये कट्टर समर्थक म्हणून या दोघांची ओळख असुन या निवडीने नवीन नांदेड भागात शिवसेनेची मोठी ताकद वाढली असून फटाक्यांची आतिषबाजी करत व ढोल-ताशांच्या गजरात या दोन्ही पदाधिकाऱ्यांची मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून या नियुक्त्या प्रलंबित होत्या , अखेर या नियुक्त्या जाहीर झाल्याने व नविन नांदेड भागातील दोन जणांची वर्णी लागल्याने शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.