हिमायतनगर। तालुक्यातील प्रा शाळा धानोरा (ज) व सिरपल्ली येथे 16 वर्ष नौकरी करून जिल्हा बदलीने लातूर येथे गेलेले शिक्षक दत्तात्रय पांचाळ सर यांचा मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना अपघात होऊन बापलेकीचा जागीच अंत झाला आणि मागे राहिलेल्या *कुटुंबियांवर अस्मानी संकट कोसळून महिना झाले नसेल तोच सुलतानी संकटाच्या विळख्यात हे कुटुंब सापडले आहे.
त्याचे झाले असे की महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना चालू केली आहे परंतु शासन हे पैसे शेअर मार्केट मध्ये लावते आणि शेअरमार्केट कसे चालते ते चालू आठवड्यात ज्यांचे लाखाचे बारा हजार झाले त्यांना समजलेच असेल तेव्हा ही योजना कोणत्याही प्रकारची पेंशन हमी देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी या योजनेवर बहिष्कार टाकला आहे. कर्मचाऱ्यांनी नवीन पेंशन योजनेत जेवढी रक्कम जमा आहे त्या रकमेचा हिशेब ही नाही आणि परतावा ही नाही.
नेमके याच संकटात पांचाळ सरांचे कुटुंब सापडले आणि सरांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर महिन्यातच उपासमारीची वेळ आली. तेव्हा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कर्मचारी बांधवांनी वर्गणी करून आज दिनांक 6/3/2022रोजी पांचाळ सरांच्या विधवा पत्नी आणि आई यांना 4 लाख 7 हजार रु नेऊन दिले आहेत.परंतु या रकमेवर कुटुंबाचा गाडा किती दिवस चालेल ? आणि अशी मदत करून कर्मचारी किती दिवस इतरांचे संसार चालवतील. पाच वर्षांसाठी आमदार झालेल्या व्यक्तीला आयुष्यभर पेंशन मिळते आणि 36 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱयांना सेवानिवृत्ती नंतर चले जावं ?
कर्मचारी अतिशय नाराज असून त्यांना जुनी पेंशन चे सुरक्षा कवच देने अतिशय आवश्यक आहे. अन्यथा अनेकांचे संसार भविष्यात उघडयावर येतील यात तिळमात्र शंका नाही.