या कार्यक्रमला खासदार हेमंत पाटील यांच्यासह आ. संतोष बांगर , आ. तानाजी मुटकुळे, जि. प. अध्यक्ष गणाजी बेले , माजी खासदार ऍड . शिवाजी माने , माजी जि. प. उपाध्यक्ष उद्धव गायकवाड , सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, सह संपर्क प्रमुख दिलीप बांगर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे , संदेश देशमुख , परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष भैया पाटील गोरेगावकर, तालुका प्रमुख भानुदास जाधव , आनंद जगताप, संतोष देवकर, शहर प्रमुख अशोक नाईक, जगन्नाथ देशमुख ,युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम , सेनगाव कृ .उ. बा. चे माजी सभापती सोंडू पाटील , सेनगावच्या नगराध्यक्षा ज्योतीताई देशमुख , यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .
खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतल्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते मजबूत करून शहरांशी जोडले जाणार आहेत. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून हिंगोली लोकसभा मदतरसंघातील हिंगोली, नांदेड, आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम मंजूर करून घेतले आणि त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे . यामध्ये पहिल्या टप्यात नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील कामाचे उदघाटन होऊन कामाला सुरवात झाली तर दुसऱ्या टप्यात हिंगोली , सेनगाव तालुक्यातील कामाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
हिंगोली तालुक्यातील प्रजिमा 29 ते इडोळी - आमला - काळकोंडी या रस्त्यासाठी, 3 कोटी 13 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत, एमडीआर 04 ते कोथळज ते समगा रस्त्याच्या कामासाठी, 3 कोटी 46 लक्ष रुपये तर नॅशनल हायवे 161 पारोळा-नवलगव्हाण रस्ता या रस्त्यासाठी 3 कोटी 46 लक्ष मंजूर झाले आहेत . एम आर एल 01 फाळेगांव ते कानरखेडा (बु.) - वांजोळा रस्ते कामाच्या विकासासाठी ता. जि. हिंगोली 3 कोटी 46 लक्ष मंजूर झाले आहेत. तसेच सेनगाव तालुक्यातील प्रजिमा 28 ते वाघजळी - काहकर - ताकतोडा या रस्त्यासाठी 3 कोटी 84 लक्ष, आणि राज्यमार्ग 248 ते सुरजखेडा रस्ता, 3 कोटी 84 लक्ष सापटगांव येथील प्रजिमा -२६ ते कौठा - कोळसा - सुकळी - सापटगांव रस्ता, 6 कोटी 87 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या सर्व रस्त्याच्या कामासाठी एकूण २८ कोटी रुपयाचा भरघोस निधी मंजूर झाला असल्याने हिंगोली , सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते येत्या काळात चकाचक झालेले दिसतील .
दि. २० रविवारी या कामाचे उदघाटन काळकोंडी , कोथळज, पारोळा, कानरखेडा, काहकर, सुरजखेडा, सापटगांव या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील, व समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे .