हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहराच्या जवळच असलेल्या व मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पेनगंगा नदीवर होणाऱ्या नवीन पुलाचे काम गेल्या वर्षापासुन रेगाळलेले असुन हेच काम आता जलद गतीने पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. ह्या पुलाचे पिल्लर नदीत अर्धवट अवस्थेत होते त्यास सेंटरींग कित्येक वर्षापासुन (लोखडी पञ्याचे आवरण) तसेच होते.
विशेष म्हणजे या नदीत असलेल्या सिमेट पिल्लर योग्य ते पाणी (क्युरींग) बांधकामाच्या वेळेस न केल्यामुळे हे सिमेंटचे पिल्लरचा दर्जा असेल का..? या बाबतीत शंका व्यक्त करण्यात येत आहे. कारण या सिमेटचे पिल्लरचे टुकडे गळुन पडत होते. यामधील बाधकामाच्या वेळी योग्य देखभाल न केल्या मुळे त्या पिल्लरचे आतील स्टील तग धरतील काय..? या अर्धवट पिल्लरच मशीन द्वरे कोरुन नव्याने सिमेट मटेरियल टाकण्यात येत असुन, वरतुन सिमेंटचा मुलमा लावण्यात येत आहे.
या पुलाच्या उशीरा सुरु करण्यात आलेल्या जुन्या पिल्लरवर नवीन बाधकाम होत असल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबतीत राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प व्यवस्थापकाडे निवेदन द्वरे विचारणा करण्यात आली. पण नेहमी प्रमाणे सर्वसामान्यच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. वारंगा ते महागाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु आहे. हा मार्ग तुळजापुर ते नागपुर प्रमुख राष्ट्रीयमहामार्ग असुन, या मार्गावरुन देशाच्या प्रमुख राज्यातुन वाहने ये-जा करितअसतात इतक्या महत्त्वाचे पुलाचे कामावर संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे.
हे पुलाचे काम नेमके कोणत्या प्रशासनाच्या खात्याकडुन होत आहे. त्याचे कञाटदार कोण पुलाचे काम पुर्ण करण्याचा कालावधी किती या बाबतीत कोणत्याही प्रकारचे या पुलाच्या प्रथम दर्शनी दिसुन येत नाही. या कामाव परप्रातिंय मजुर दिसुन येतात ते आपल्या अनुभवाने नदीत अर्धवट पिल्लरचे काम करतांना दिसुन येत आहे. माञ या कामी संबंधित कोणी इजिनिअर माञ दिसुन येत नाही. भविष्य काळात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अप्रिय घटना होऊ नये यासाठी माञ प्रशासन माञ जागरुक दिसुन येत नाही.