बिलोली/नांदेड| रामतीर्थ पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशी असलेल्या राम गंगाधर टेकाळे या युवकाच्या पोटात चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. हि घटना दि.१७ म्हणजे होळीच्या दिवशी रात्री घडली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होळीच्या दिवशी दि.१७ मार्च रोजीचे रात्री २१ वाजेच्या सुमारास, रामतीर्थ ता. बिलोली जि. नांदेड येथे, राम गंगाधर टेकाळे हा मांतग समाजाचे मंदिराजवळ बसला असता आरोपी शेषेराव देगलूर याने तु येथे का..? बसलास म्हणुन वाद घाटाळा. आणि आपल्याजवळील चाकूने फिर्यादीचे पोटात मारुन गंभीर जखमी करुन खुन करण्याचा प्रयत्न केला.
यात युवक गमाभीर जखमी झाला असून, त्याचेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संदर्भात राम गंगाधर टेकाळे वय २७ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. डोंगरगाव ता. मुखेड जि. नांदेड ह.मु. रामतीर्थ ता. बिलोली जि. नांदेड यांनि दिलेल्या फिर्यादवरुन रामतीर्थ पोलीस ठाण्यात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानेश्वर देगलूरकर याच्याविरुद्ध गुरन ४६/२०२२ कलम ३०७ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.डी. जाधव, मो. नं. ९८२३५२४५२९ हे करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अश्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांनी गुंडगिरीच्या वाढत्या प्रकाराला रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी येथील नागरीकातून केली जात आहे.